Navgan News

ताज्या बातम्या

इस्त्रायल हादरलं, युद्धविरामानंतर पहिल्यांदाच सर्वात मोठा हल्ला, थेट., युद्ध पुन्हा पेटणार? जगभरात मोठी खळबळ…

अमेरिका, इराण आणि इस्त्रायलमध्ये भीषण युद्ध सुरू होतं, या युद्धाचा संपूर्ण जगालाच मोठा फटका बसला. अखरे 40 व्या दिवशी अमेरिका आणि इराणकडून युद्धविरामाची घोषणा करण्यात आली. इस्त्रायलने देखील युद्धविराम झाल्याचं म्हटलं.

मात्र युद्धविरामाला 24 तास उलटत नाहीत तोच इस्त्रायलकडून लेबनॉनवर भीषण हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये हिजबुल्लाहच्या काही सदस्यांसोबतच लेबनॉनमधील सामान्य नागरिकांचा देखील मृत्यू झाला होता. आमचा युद्धविराम फक्त इराणपुरताच मर्यादित आहे, आम्ही लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवणार असं इस्त्रायलने म्हटलं होतं. यावरून वातावरण चांगलं तापलं, इराणकडून तर थेट धमकी देण्यात आली होती, जर लेबनॉनवर हल्ला केला तर आम्ही युद्धविराम मागे घेऊ असं इराणने म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे इस्त्रायलवर भीषण मिसाईल हल्ला करण्यात आला आहे. इस्त्रायलच्या दक्षिणेकडील बंदरावर हा हल्ला करण्यात आला आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. इस्त्रायलच्या नौदलाच्या तळावर हा हल्ला करण्यात आला आहे. युद्धविराम होऊन देखील इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ला केला त्याचा बदला म्हणून आम्ही इस्त्रायलच्या नौदलाच्या तळावर हल्ला केल्याचं हिजबुल्लाहने म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे आता पुन्हा एकदा तणाव वाढण्याची शक्यता आहे.या हल्ल्यावर अद्याप इस्त्रायलकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाहीये.

हिजबुल्लाहकडून यावेळी इस्त्रायलला धमकी देखील देण्यात आली आहे. जर इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ले सुरूच ठेवले तर आम्ही इस्त्रायलवर हल्ले करू असं हिजबुल्लाहने म्हटलं आहे. दरम्यान आता या हल्ल्यामुळे वातावरण तापण्याची शक्यता आहे. या हल्ल्यानंतर आता इस्त्रायलकडून देखील लेबनॉनवर पुन्हा एकदा हल्ला होऊ शकतो. जर इस्त्रायलने लेबनॉनवर हल्ला केला तर इराण आक्रमक होऊ शकतं, इराणने या आधी देखील लेबनॉनचा युद्धविरामामध्ये समावेश असून त्यांच्यावरील हल्ले बंद करावेत असं म्हटलं होतं. जर लेबनॉनवर हल्ले सुरू राहिले तर आम्ही पुन्हा एकदा स्ट्रीट ऑफ होर्मजू बंद करू असा इशाराही इराणने दिला होता, मात्र आता इस्त्रायल पुन्हा एकदा लेबनॉनवर हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *