Navgan News



Add Space

ताज्या बातम्याधार्मिकनवगण विश्लेषण

वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील थरारक आणि प्रेरणादायी कथा…

वाल्मिकी रामायणामध्ये सुंदरकांडातील प्रेरणादायी कथा
कांड या नावाने ओळख
एकूण किती कांंड आहेत

सुंदरकांड हे वाल्मिकी रामायणातील पाचवे आणि अत्यंत महत्त्वपूर्ण अध्याय आहे, जे मुख्यत्वे हनुमानाच्या शौर्य, बुद्धिमत्ता, भक्ती आणि पराक्रमाचे वर्णन करते.

यात हनुमान समुद्र ओलांडून लंकेत सीतेचा शोध घेणे, अशोक वनात सीतेला भेटणे, लंकादहन करणे आणि प्रभू रामाकडे परत येणे या विजयी मोहिमेचे वर्णन आहे.

रामायण हे वाल्मिकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणामध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, सुग्रीव, अंगद, मेघनाद, विभीषण, कुंभकर्ण आणि रावण या पात्रांचा समावेश आहे. रामायणाची कथा ही त्याग आणि समर्पणावर आधारित आहे. रामाचे भावांशी, मित्रांशी असलेले नाते याचे सुंदर चित्रण वाल्मिकींनी केले आहे. सीतेचे अपहरण आणि त्यानंतर रामाकडून रावणाचा वध कसा करण्यात आला यावरही रामायण आधारित आहे. रामायण हे श्लोक म्हणजेच कांडमध्ये विभागले गेले आहे. यातील सुंदरकांड हे जणू हनुमानंतालाच समर्पित केले आहे.

कांड या नावाने ओळख

रामायणामध्ये एकूण 24 हजार श्लोक असून ते सात कांडांमध्ये विभागले गेले आहेत. रामायणाच्या या अध्यायांना कांड या नावानेही ओळखले जाते. या सात कांडांमध्ये रामाच्या जन्मापासून ते अवतार समाप्तीपर्यंतचे जीवन सांगणारे रामायण हे सात कांडात विभागले आहे. सात कांडांमध्ये बाल कांड, अयोध्या कांड, अरण्य कांड, किष्किंधा कांड, सुंदर कांड, युद्ध कांड, उत्तर कांड यांचा समावेश आहे.

सुंदर कांड हे असे एकमेव कांड आहे ज्यात मुख्य पात्र श्रीराम नसून हनुमान आहेत. या कांडात हनुमानाचे साहस, शौर्य आणि त्याचा निस्वार्थीपणा, शक्ती आणि रामाप्रतीची भक्ती सांगण्यात आली आहे. माता अंजनी हनुमानास लाडाने सुंदर संबोधत असे आणि ऋषी वाल्मिकींनी हेच नाव निवडले. या कांडात हनुमानाचा लंकेत पोहोचण्यापर्यंतचा प्रवास सांगण्यात आला आहे.

सुंदरकांड का नाव ठेवले असेल

सीता संशोधन कार्य रामाने जितक्या विश्वासाने हनुमान सोपविले होते. तितक्याच विश्वासाने ते काम त्याने केले. सुंदरकांड हे हनुमानाच्या लिलानेच भरलेले आहे. प्रत्येक कांडाला सार्थ नाव दिलेले आहे. बालकांड, अरण्यकांड, आयोध्याकांड, किष्किंधाकांड, उत्तराकांड या प्रत्येक नावाला स्वतःचा स्वतंत्र अर्थ आहे. परंतु सुंदरकांड असे नाव का ठेवले असेल? याचा अर्थ असा की, भगवंत भक्तीच्या लिला ईश्वराला सुंदर वाटल्या म्हणून त्यांचे नाव सुंदरकांड ठेवले आहे. रामाला भक्ताचे काम सुंदर वाटले, कर्तृत्वशक्ती सुंदर वाटली. त्याच्या लिला, धडपड, बुद्धीमता वैगरे गोष्टी सुंदर वाटल्या म्हणून महर्षी वाल्मिकींनी त्यांचे नाव सुंदरकांड ठेवले. ज्यांचे परमेश्वर चिंतन करतो अशा महापुरुषांपैकी हनुमान एक आहेत.

थोडक्यात, सुंदरकांड हे हनुमानाच्या निस्वार्थी सेवाभावाचे, पराक्रमाचे आणि रामभक्तीचे महाकाव्य आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. नवगण न्यूज 24 या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *