Navgan News

ताज्या बातम्याधार्मिकनवगण डोअर बीडराष्ट्रीय

घोड्याशी संबंधित करा हा सोपा उपाय, आयुष्यात पैसा कमी पडणार नाही…


वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? याबद्दल तर मार्गदर्शन करण्यात आलंच आहे. परंतु त्यासोबतच जर तुमच्या घरात काही वास्तुदोष निर्माण झाले असतील तर ते कसे दूर करावेत?

याबद्दल देखील अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, जसं की काही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात, घरात नेहमी पैशांची तंगी जाणवते, असे वास्तुदोष दूर करण्यासाठी काय करावे? याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये माहिती देण्यात आली आहे. वास्तुशास्त्रामध्ये घोड्याला अत्यंत महत्त्व आहे, वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात घोडा असतो, किंवा घोड्याची प्रतिमा असते, त्या घराचं नेहमी नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होतं. अशा घरात कधीही आर्थिक समस्या येत नाहीत. आज आपण असेच घोड्याशी संबंधित काही सोपे उपाय जाणून घेणार आहोत.

लाल घोड्याला वास्तुशास्त्रामध्ये विशेष महत्त्व आहे, घरात लाल घोड्याची प्रतिमा असणं शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरात लाल घोड्याची प्रतिमा असेल तर घरात वास्तुदोष निर्माण होत नाही, घराला आर्थिक स्थैर्य प्राप्त होते, सर्व वाईट गोष्टींपासून तुमच्या घराचं संरक्षणं होतं असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. कारण घोडा हा प्राणी चपळता, आणि ऊर्जा यांचं प्रतिक मानलं जातं, त्यामुळे घोड्याची प्रतिमा नेहमी घराच्या पूर्व दिशेला ठेवावी. लाल घोड्याची प्रतिमा असेल तर उत्तमच.

दुसरा महत्त्वाचा उपाय म्हणजे घोड्याची नाल, घोड्याची नाल जी असते ती जर तुम्ही तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबऱ्याला ठोकली तर तुमच्या घरात कोणतीही नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही, सर्व नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्याच्या आधीच नष्ट होते, घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहते असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

आणखी एक उपाय म्हणजे घरात धावत्या घोड्याचं चित्र लावावं, घरात पूर्व दिशेला तोंड कडून धावत्या घोड्याचं चित्र लावलं तर ते अतिशय शुभ मानलं जातं, त्यामुळे घरातील सर्व आर्थिक समस्या दूर होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

( वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *