“संबंध ठेवले नाही तर गुन्हा दाखल करीन”; विवाहित शेतकऱ्याला ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर अखेर गुन्हा दाखल!

बार्शी : खडकलगाव(ता.बार्शी)येथे शेतामध्ये रोजदारीवर येत असलेल्या महिलेशी प्रेमसंबध जुळले वारंवार पैसे दिले पैसे दिले नाही तर वाद घालत,तू संबंध ठेवले नाही तर पोलिसांत गुन्हा दाखल करीन अशा त्रासाला कंटाळून विवाहित शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याप्रकरणी महिलेवर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्योती उर्फ सोनी संजय गव्हाणे(रा.खडकलगाव,ता.बार्शी) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे सुरेश रंगनाथ रोंगे (वय ६६,रा.खडकलगाव)यांनी फिर्याद दाखल केली मुलगा सोमनाथ सुरेश रोंगे(वय ३५)असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे ही घटना शुक्रवार(ता.१७)रोजी सकाळी साडेअकराच्या दरम्यान घडली.
मागील दीड वर्षांपासून मुलगा सोमनाथ याचे ज्योतीचे संबंध होते शेतीचे रोजंदारीचे काम सांगण्यासाठी तो रोज तिचे घरी जात असे त्यामुळे जास्त ओळख होऊन प्रेमसंबंध वाढले सोमनाथ तिला पैसे देत असत पैसे दिले नाही की ती वाद-विवाद करीत असे तू संबंध ठेवले नाही तर तुझ्यावर गुन्हा दाखल करीन अशी धमकी देत असे.
सोमनाथ यांस तुझा विवाह झाला आहे,पत्नी,दोन मुले आहेत नादी लागू नको असे सांगितले तर ज्योती गव्हाणे हिला देखील सांगितले तिने यापुढे नादी लागणार नाही,त्यास बोलणार नाही असे म्हटली होती.
वारंवार तुला पोलिसांत अडकवीन अशी धमकी गव्हाणे देत असल्याने सोमनाथ तणावात होता शुक्रवारी(ता.१७)रोजी सकाळी नऊ वाजता आम्ही सर्वजण घरी असताना तो शेतामध्ये कांद्याला पाणी देण्यास गेला भावकीतील अर्जुन रोंगे यांनी सोमनाथने लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे सांगितले सोमनाथ यांस आत्महत्येस प्रवृत्त केले असे फिर्यादीत म्हटले आहे.