
केज : वीस वर्षीय तरुणाने एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून थेट तेलंगणा राज्य गाठले आणि पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून मुलीसह आरोपीला तेलंगणा राज्यातून ताब्यात घेतले आहे.
केज तालुक्यातील काशिदवाडी येथून दि.३० मे रोजी १२ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या १६ वर्ष वयाच्या मुलीचे अपहरण केले होते. अपहृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारी वरून केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेला तीन महिन्या पेक्षा जास्त कालावधी उलटून देखील त्या प्रकरणी संशयित आरोपींचा ठाव ठिकाणा लागत नव्हता. या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम यांनी तपास करीत असताना संशयित अपहरणकर्ता हर्षद बालाजी जाधवर याच्यावर लक्ष्य केंद्रित करून गुप्त पद्धतीने आणि तांत्रिक पद्धतीने तपास केला. संशयिताच्या नातेवाईकांचे फोन कॉल व सीडीआर यांचा तपास केला असता आरोपींचे लोकेशन ही तेलंगणा राज्यात आढळून आले.
त्यानंतर वरिष्ठांची परवानगी घेऊन पोलिस उपनिरीक्षक उमेश निकम हे त्यांचे सहकारी पोलिस हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक किशोर गोरे आणि महिला पोलिस कॉन्स्टेबल जयश्री भालेराव यांच्यासह तेलंगणाच्या दिशेने रवाना झाले. तेलंगणात पोहोचल्या नंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी पत्ता शोधला. त्यावेळी संशयित हर्षद बालाजी जाधवर आणि ती अल्पवयीन मुलगी हे तेलंगणा राज्यातील खम्मम जिल्ह्यातील मोडीगोंडा येथे एका फरशीच्या कारखान्यात काम करीत असल्याची माहिती मिळाली. त्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेऊन केज पोलिस ठाण्यात आणले.
त्या नंतर हर्षद जाधवर याच्यावर बलात्कार आणि पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास आता पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
त्या तरुणाला पोलिस कोठडी तर अल्पवयीन मुलगी सुधारगृहात ! :
आरोपी हर्षद जाधवर याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १५ सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पीडित मुलीची रवानगी सुधार गृहात करण्यात आली आहे.
मुलीच्या वडिलांनी केला होता आत्महत्येचा प्रयत्न : मुलीच्या अपहरणाच्या नैराश्यातून मुलीच्या वडिलांनी दि. ३ सप्टेंबर रोजी दुपारी ३:०० च्या सुमारास विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता