
Crime News : बार्शी तालुक्यातील नारीवाडी येथे एका शेतकऱ्याने गावातील व्यक्तीकडून सुरू असलेल्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (ता. ९) सकाळी घडली. बालाजी महादेव शिंदे (वय ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत मृताचा भाऊ लक्ष्मण महादेव शिंदे यांनी पांगरी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गावातील हणुमंत विठ्ठल वाघ हा मृताची पत्नीवर वाईट नजर ठेवत होता. त्याने मृताच्या पत्नीस शारीरिक संबंध ठेवण्याची मागणी करत धमक्या दिल्या होत्या. या त्रासाला कंटाळून बालाजी शिंदे यांनी आपले घर सोडून शेतातील वस्तीत राहण्यास सुरवात केली होती.
तरीदेखील हनुमंत वाघ त्यांचा पाठलाग करून त्रास देत राहिला. सततच्या या त्रासामुळे बालाजी शिंदे तणावाखाली होते. घटनेच्या दिवशी सकाळी बालाजी शिंदे यांनी त्यांच्या मित्रांना व भावाला व्हॉट्सॲपवरून, माझ्या मृत्यूला हनुमंत वाघच जबाबदार आहे. त्याला कठोर शिक्षा व्हावी, असा संदेश पाठवला होता.