Video : व्हिडिओनवगण विश्लेषण

गाणी ऐकत उचलला साप, जसं की रोजचंच काम, तरुणीचा Video


साप पाहताच लोकांच्या मनात भीती उद्भवते. काही लोक तर जिथे साप असेल तिथून भितीने पळून जातात.

त्यामुळे कधी कधी लोक सापाला मारतात तर कधी त्याला त्रास देतात.

पण यासंबंधीत एका तरुणीचा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती अशापद्धतीने साप पकडते की ते पाहून सगळेच आश्चर्यचकीत होत आहेत. तिचं कृत्य खरोखरंच कौतुकास्पद आहे.

व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता एक महिला टीव्हीच्या खाली आणि प्रिंटरच्या मागे काहीतरी करु पाहाते, त्यानंतर ती आतून साप उचलते आणि त्याला आपल्या हातावर खेळवते आणि त्याला आरामात एका थैलिमध्ये बंद करते. हे सगळं करत असताना ही तरुणी जराही घाबरली नाही. आश्चर्य म्हणजे गाणी ऐकत ऐकत ती तरुणी हे सगळं अगदी आरामात कर होती.

बरं, ती लोकांशी बोलून हे काम सहज करत होती. तसेच साप दिसल्यास काय खबरदारी घ्यावी? हे देखील ती सांगत होती, शिवाय हा साप विषारी नाही तो उंदीर खातो असं देखील ही तरुणी सांगत होती. शिवाय सापाला मारु नका किंवा त्रास देऊ नका नाहीतर तो सर्प मित्रालाही दंश करु शकतो असं देखील ती तरुणी सांगत होती.

 

महिला थेट साप पकडत आहे. त्यामुळे बहुतेक लोक तिची खूप प्रशंसा करत आहेत. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *