काही व्यक्तींना तोंडाच्या दुर्गंधीच्या समस्या असतात. तोंडाचा घाण वास आल्याने त्या व्यक्तीशी बोलावे वाटत नाही. तसेच त्या व्यक्तीला देखील चार माणसांत बोलताना संवाद साधताना लाज वाटते.
आता अशाप्रकारे तोंडाचा खराब वास येण्याची अनेक कारणे असू शकतात.
त्यामुळे आधी तोंडाचा वास का येतो? त्याची कारणे जाणून घेऊ.
सर्वात महत्वाचं म्हणजे दात व्यवस्थित न घासल्यास त्या व्यक्तीच्या तोंडाचा खराब वास येतो. त्यामुळे सर्वात आधी दात अगदी निट आणि स्वच्छ पद्धतीने क्लिन करावेत. त्यासह अनेकवेळा आपण कांदा, लसून असे विविध पदार्थ खातो. तसेच काही व्यक्ती मद्यपान आणि धुम्रपान देखील करतात. त्यामुळे त्यांच्या तोंडाचाही वास येत असतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने देखील तोंडाचा वास येण्याची शक्यता असते.
उपाय काय करावेत?
सर्वात महत्वाचं म्हणजे कायम पोटभर पाणी प्या. अनेकवेळा व्यक्ती कामाच्या व्यापात तहान भूक विसरून काम करतात. मात्र असे करणे चुकीचे आहे. तसेच वातावरण थंड असल्यावर देखील व्यक्ती फार कमी पाणी पितात. मात्र असं केल्याने आपल्या तोंडाचा वास येतो. पाणी की झाल्याने डिहायड्रेशन आणि तोंडातील बॅक्टेरीआ वाढण्यास सुरुवात होते.
काही व्यक्ती ब्रश करताना जीभ घासत नाहीत. मात्र आपल्या दातांप्रमाणे आपल्या जीभेवर देखील बॅक्टेरीआ असतात. त्यामुळे दररोज जीभ घासली पाहिजे, स्वच्छ केली पाहिजे. अन्यथा त्याने देखील तोंडाचा खराब वास येऊ लागतो.
खाण्यापिण्याच्या गोष्टींमध्ये वेगळे पदार्थ आल्यास आपल्या तोंडाचा वास येतो. जेव्हा केव्हा तुम्ही कच्चा कांदा किंवा लसूण खाल तेव्हा जेवण झाल्यावर लगेचच पाण्याने गुळण्या करा किंवा ब्रश करून घ्या.