सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक ढोले पाटील यांच्या सामाजिक कार्याला मिळाला न्याय
सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते अशोक ढोले पाटील यांच्या सामाजिक कार्याला मिळाला न्याय
बीड : सामाजिक कार्यात गेल्या 15 वर्षापासुन सामाजिक व आरोग्य क्षेत्रात कुठलेही राजकीय पाठबळ नसताना, आपली आगळी वेगळी ओळख निर्माण करणारे बीड जिल्हयातील सुप्रसिध्द सामाजिक कायकर्ते तथा युवा नेते नावाने ओळखले जाणारे बार्शी नाका परिसरातील अशोक (दादा) ढोले पाटील यांच्या कार्याची दखल घेऊनर त्यांना न्याय देण्यात आला.
आरोग्यदुत धर्मवीर प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव (दादा) चव्हाण यांनी स्वत: त्यांचे कार्याची दखल घेवुन व जिल्हा अध्यक्ष महादेवजी मातकर, वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य प्रमुख राम राऊत यांच्या सुचनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा.खासदार डॉ. श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुचनेनुसार वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना मदत कक्षाच्या बीड सह कक्ष प्रमुख पदी निवड करुन जिल्हा प्रमुख अनिल दादा जगताप व सचिन भैय्या मुळूक व आरोग्य दुत बाजीराव (दादा) चव्हाण व वैद्यकिय जिल्हा प्रमुख महादेव मातकर वैद्यकिय टीमसह पदाधिकाऱ्याच्या उपस्थित सन्मानपत्र देवुन त्यांना पुढील कार्यास्तव शुभेच्छा देवुन अभिनंदन करण्यात आले.
सदर निवडीमुळे बीड शहर व तालुक्यातील सर्व गरजु रुग्णांना सदर पदामुळे निश्चीतच न्याय मिळुन त्यांच्या विविध आजारांवर शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांच्या मतीने मात करण्यासाठी कार्य करण्यासाठी पाठबळ मिळणार आहे. त्यांचे या निवडीबद्दल समाजातील विविध स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.