महाराष्ट्रराजकीय

वंचितचा उमेदवार ! शेतकऱ्यांच्या भविष्यवेत्त्याला उमेदवारी; पंजाबराव डख यांनी अर्ज भरला


महाराष्ट्रात जी दोन आघाडी-युतीमध्ये थेट लढत होणार होती काही मतदारसंघांत तिला त्रिशंकू करणाऱ्या वंचित आघाडीने काही दिवसांपूर्वी मविआला धक्का देत उमेदवार यादी जाहीर केली होती. यापैकी एक उमेदवार बदलला आहे.

अनेक ठिकाणी विविध पक्ष आपले उमेदवार मागे घेऊन नवीन उमेदवार देत आहेत. अशातच वंचितने परभणी मतदारसंघातील उमेदवार बदलला आहे.

गेल्या काही दिवसांत वंचितने तिसरा उमेदवार बदलला आहे. काही दिवसांपूर्वी परभणीतून प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब उगले यांना उमेदवारी दिली होती. परंतु उगलेंची उमेदवारी बदलून वंचितने हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. आज त्यांनी उमेदवारी अर्ज भरला.

काही दिवसांपूर्वी डख हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. आता परभणीमध्ये त्रिशंकु लढत होणार आहे. महायुतीने परभणीतून महादेव जानकर यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने संजय उर्फ बंडू जाधव यांना रिंगणात उतरविलेले आहे.

वंचितमध्ये कोण कोण बदलले…
वंचितने आतापर्यंत १९ मतदारसंघांमध्ये उमेदवार दिले आहेत. यापैकी तीन उमेदवार बदलण्यात आले आहेत. रामटेकच्या उमेदवाराने तांत्रिक कारण सांगत माघार घेत काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार किशोर गजभिये यांना पाठिंबा जाहीर केला आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात सुभाष चव्हाण या उमेदवाराला बदलून अभिजित राठोड यांना उमेदवारी दिली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *