Video : व्हिडिओआगळे - वेगळेधार्मिक

श्री राम मंदिर – सविस्तर Live कव्हरेज येथे पहा!


अयोध्या : अयोध्येमध्ये रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. या सोहळ्यानिमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. अयोध्यानगरीत जणू पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली जात आहे.

श्री राम मंदिर – सविस्तर Live कव्हरेज येथे पहा!

👇👇👇👇

या सोहळ्याला देशभरातून मान्यवरांची उपस्थिती आहे. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींनी पारंपारिक लूक केला होता. त्यांच्या हातात एक विशेष वस्तू होती जी त्यांनी रामलल्लाचरणी अर्पण केली आहे. ही वस्तू नेमकी काय होती याची चर्चा सुरू झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गर्भगृहाच्या दिशेनं जात होते तेव्हा त्यांच्या हातात ताट होतं. त्यामध्ये विशेष वस्तू होत्या ज्या त्यांनी रामलल्लाचरणी अर्पण केल्या आहेत. रामलल्लासाठी चांदीचं छत्र, खास डिझाइन असलेली वस्त्र आणि ताट असं त्यांच्या हातात होतं. त्यांनी या वस्तू अर्पण करत पुजाऱ्यांकडे सोपवल्या आहेत.

रामलल्लाच्या प्राणपतिष्ठा सोहळ्याला सुरुवात झाल्यानंतर राम मंदिर परिसरात घोषणा सुरू झाल्या. भक्तीमय वातावरणात हेलिकॉप्टरमधून पुष्पपुष्टी करण्यात आली. पूजा आणि त्यानंतर रामलल्लाची आरतीही करण्यात आली. यावेळी उपस्थित सर्व भाविकांना छोटी घंटा देऊन ती पूजेसाठी वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं होतं.

यावेळी गाभाऱ्यात पीएम नरेंद्र मोदी आणि पूजाऱ्यांसोबत मोहन भागवत, योगी आदित्यनाथ, राज्यपाल उपस्थित होते. याआधी राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रभू राम कुठून आणि कशासाठी आला हे सांगितले. रामजींच्या माहेरच्या छत्तीसगडमधून अनेक भेटवस्तू आल्या आहेत. मंदिराचा दगड राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातील आहे.

मंदिराच्या दरवाजासाठी लाकूड महाराष्ट्रातून आले आहे. त्यावर सोन्याचा मुलामा चढवण्यात आला असून मुंबईतील एका हिरे व्यापाऱ्याने त्याला भेट दिली आहे. ज्या दगडातून देवाची मूर्ती बनवली आहे तो कर्नाटकातील आहे. ही मूर्ती म्हैसूर येथील कारागीर अरुण योगी राज यांनी बनवली आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *