सरकारच्या विनंतीला मान देऊन दोन महिन्यांसाठी स्थगिती मा.मनोज जरागे पाटील
गेवराई : (सखाराम पोहिकर ) गेवराई येथे गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेवराई येथील माऊली. गंगाधर व सतिश पवार यांनी गेल्या सात दिवसांपासून साखळी उपोषण चालू होते.तेव्हा दिनांक 2/11/2023 रोजी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाजाचे जनक मनोज जरागे पाटील यांनी सरकारच्या विनंतीला मान देऊन यांनी मराठा समाजाला दोन महिन्यांचा कालावधी देऊन उपोषण स्थगित केल्यानंतर गेवराई येथे मा.मनोज जरागे पाटील यांच्या स्मरणार्थ चालू असलेल्या 7 दिवसांपासून माऊली गंगाधर व सतिश पवार हे आमरण उपोषणाला बसले होते व दररोज साखळी उपोषण चालू होते तेव्हा गेवराई तहसीलचे तहसीलदार मा.सदिप खोमणे साहेब यांच्या हस्ते ज्युस पिऊन उपोषण स्थगित केले यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव व आरक्षणासाठी पाठिंबा दिलेले ईतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तरी या मराठा आरक्षणासाठी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांचे व ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्या सर्वाचे मराठा समाजाच्या वतीने आभार मानले व उपोषणाला दोन महिन्यांसाठी स्थगिती देण्यात आली