उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, कोविड काळात महाराष्ट्रात लोकांना उपचार मिळत नव्हते तेव्हा तुम्ही प्रेतांसाठीच्या बॅगामध्येही घोटाळे केले
नागपूर : शिवतीर्थावर अर्धवट भरलेल्या मैदानात अर्धवटरावांनी आज पुन्हा एकदा पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांचेवर टीका केली आणि घराणेशाही वाचवण्यासाठी एकत्र आलेल्या इंडी आघाडीची वकीली केली.
समर्थांचा हवाला देत मूर्खांची लक्षण सांगून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपने शरसंधान केले आहे.
भाजपनं केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांनी लक्षात ठेवावं, कोविड काळात महाराष्ट्रात लोकांना उपचार मिळत नव्हते तेव्हा तुम्ही प्रेतांसाठीच्या बॅगामध्येही घोटाळे केले, कोविड सेंटर उभारणीत कुणी लोणी खाल्लं हे लोक विसरले नाहीत. कट कमिशनवर तुम्ही केलेल्या औषध घोटाळ्यांची चौकशी सुरू आहे. तुम्हाला हनुमान चालीसाबद्दल ॲलर्जी आहे म्हणून तर हनुमान चालिसा म्हणाऱ्यांना तुरुंगात डांबलं आणि आता व्यंकटेश स्तोत्र आठवत आहे. आम्हाला आज समर्थांची आठवण झाली, त्यांनी तुमच्यासाठीच लिहून ठेवलं असावं
आपली आपण करी स्तुती |
स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती |
तो येक मूर्ख ||
यापुढे तुम्ही मोदी यांचेवर टीका केल्यास याच शब्दात तुमचा उद्धार केला जाईल. उद्धवजी एक सांगतो, तुम्हाला आता तुमचे सहकारी सुद्धा कंटाळले आहेत. तो दिवस लवकरच येईल जेव्हा तुम्ही मागे वळून बघाल तेव्हा एकही माणूस शिल्लक राहणार नाही . मी आणि माझे कुटुंब हेच तुमचे विश्व आहे आणि तेच राहील असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपतर्फे म्हटले आहे.