ताज्या बातम्यानागपूर

नाशिकमध्ये चित्त थरारक अपघात, कार पलटी खाऊन दुसऱ्या लेनच्या कारवर आदळली, हाहा:कार


नाशिक-मुंबई महामार्गावर आज भीषण अपघात घडला. या अपघातात दोन चारचाकी वाहनांचं प्रचंड नुकसान झालंय. विशेष म्हणजे एका कारचा तर चक्काचूर झालाय. अपघात प्रचंड भयानक होता.

संबंधित अपघात अंगावर काटा आणणारा होता. सुदैवाने या अपघातात कुणाचाही जीव गेला नाही. पण दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शींचा घटना घडली तेव्हा प्रचंड थरकाप उडाला. या अपघातग्रस्त वाहनांची अवस्था पाहिल्यावर अपघात किती भीषण झालाय, याची आपल्याला प्रचिती येईल.

नाशिक-मुंबई महामार्गावर नाशिकहून मुंबईच्या दिशेने जात असताना दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास मुंढेगाव जवळ संबंधित अपघाताची घटना घडली. किया कार क्रमांक MH 15 HC 5540 च्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे ही कार पलट्या खाऊन विरुद्ध बाजूच्या लेनवर गेली. अतिशय वेगाने पलट्या खात ही गाडी बाजूच्या लेनवर गेली.

संबंधित अपघातग्रस्त कार मुंबईहून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या किया कार क्रमांक MH 17 CM 6391 वर जोरात आदळली. या अपघातात कारमधील नारायण कचरू लोहकरे (वय 44), अनुसया नारायण लोहकरे (वय 36) हे दोन जण गंभीर जखमी झाले.

स्थानिकांनी जखमींना वाचवले

संबंधित घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि प्रशासन घटानस्थळी दाखल झाले. स्थानिकांनी तिथे गर्दी केली. स्थानिकांनी जखमींना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. प्रशासनाने स्थाविकांच्या मदतीने तातडीने जखमींना घोटी येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.

जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या मोफत रुग्णवाहिकेने जखमींना महामार्ग पोलिसांच्या मदतीने घोटी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *