चांगला, दमदार पाऊस व पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी.’
घाटनांद्रे : कवठेमहांकाळ तालुक्याच्या खरीप हंगाम पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये.
चांगला, दमदार पाऊस व पुरेशी ओल झाल्यानंतरच पेरणी करावी, बी-बियाणे, खते खरेदी करताना योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
दरम्यान, घाटमाथ्यावरील गावांसह तालुक्यात १३ हजार २५४ टन रासायनिक खतांची आवश्यकता आहे. त्यानुसार कृषी विभागाकडून खतांची मागणी करण्यात आली आहे. या हंगामात शेतकरी ज्वारी, बाजरी, मका या पिकांबरोबर तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन ही पिके घेतात.