राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर भाकरी फिरली असताना आता प्रदेश राष्ट्रवादीत भाकरी फिरवली जाणार आहे. मग विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची वर्णी लवकरच प्रदेशाध्यक्षपदी लावली जाणार आहे.
तर विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विरोधी पक्षनेते होऊ शकतात, अशी चर्चा राष्ट्रवादीत आहे.
त्यामुळे राज्यात येणार्या निवडणुका या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढू शकते. अशावेळी त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले तर अजित पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ठरतील. या फॉर्म्युल्यामुळे दोघांचे समाधान करण्याचे प्रयत्न पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडून होतील.