ताज्या बातम्या

बंदुकीच्या धाकाने हॉटेल मालकीचे अधिकार घेतले, नामांकित ‘वैशाली’ हॉटेल मालकाच्या मुलीची पतीविरोधात तक्रार


फर्ग्युसन रस्त्यावरील हॉटेल वैशाली नावावर करुन घेण्यासाठी पतीने बंदूकीचा धाक दाखविला. त्याने पॉवर ऑफ अटॉर्नी करून हॉटेल स्वत:च्या नावावर करून घेतल्याची तक्रार महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

त्याशिवाय कंपनीच्या नावावर असलेल्या 52 कोटींवर किंमतीच्या मोटारी परस्पर विक्री केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लग्नाआधी 2018 मध्ये पीडितेला घोले रोड येथील राहत्या घरी नेले. त्याठिकाणी फिर्यादीला दारु व ड्रग्ज पाजून शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर बंदुकीचा धाक दाखवून तिच्याकडून जबरदस्तीने हॉटेल वैशालीची पॉवर ऑफ अटर्नी स्वतःच्या नावावर करून घेतली. त्याशिवाय कंपनीच्या नावावर खरेदी केलेल्या 52 कोटी 50 लाखांच्या चार महागड्या कार परस्पर विकल्या. 1 कोटी 70 लाख रुपयांचे दागिने आणि दोन महागड्या मोटारी ताब्यात घेतल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस तपास करीत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *