सध्याच्या काळात उन्हाळ्यामुळं लोक शरिराला गारवा देण्यासाठी मठ्ठा पिणं पसंत करत आहे. परंतु त्याचे जसे आरोग्याला फायदे आहेत तसे काही धोकेही आहेत, वाचा… उन्हाळ्यात मठ्ठा पिणं अनेकांना आवडतं. त्यामुळं शरिराला गारवा मिळतो. परंतु काही जण जेवण केल्यानंतर मठ्ठा प्यायला पसंती देतात. मठ्ठ्यात अनेक फायदेशीर घटक असतात. त्यात विविध जीवनसत्त्वे आणि खनिजे आणि भरपूर प्रोबायोटिक्स देखील असतात. त्यामुळं पोटाच्या विविध समस्यांसाठी हे खूप उपयुक्त ठरतं. मठ्ठाचं सातत्यानं सेवन केल्यास त्यामुळं त्याचा सकारात्मक प्रभाव हा त्वचेवर होत असतो. त्यामुळं चेहऱ्यावर ग्लो येऊन सौंदर्य अधिक खुलतं. त्यामुळं सुंदर दिवण्यासाठीही मठ्ठाचं सेवन करायला हवं. जर तुम्हाला ताप आलेला असेल तर अशावेळे मठ्ठाचं सेवन करू नका. त्यामुळं शरिरातील तापमान आणखी वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं तुम्ही आजारीदेखील पडू शकता.कंबरदुखी किंवा सांधेदुखीने त्रस्त असलेल्या लोकांनीही मठ्ठाचं सेवन करू नये, कारण यामुळं त्यांच्या वेदना आणखी वाढण्याची शक्यता असते. जर तुम्हाला सर्दी आणि खोकल्याचा त्रास होत असेल तर मठ्ठा अजिबात पिऊ नका. कारण त्यामुळं तुमचा त्रास वाढण्याची शक्यता असते. त्याचबरोबर ज्या लोकांना हृदयविकाराची समस्या आहे त्यांनी मठ्ठा पिऊ नये. कारण काही प्रकरणांमध्ये मठ्ठा रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढवतो. त्यामुळं हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.