आपल्या सर्वांना हे माहिती आहे की, गूळ खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे आपल्यापैकी प्रत्येकांच्या घरात गूळ असतोच. रात्री जेवल्यानंतर गूळ खावा असे म्हटले जाते. कारण ते पचनासाठी फायदेशीर असते. गुळामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते जे शरीरातील लोहाची कमतरता भरुन काढते. कोणत्याही मार्गाने गुळ शरीरात जावा यासाठी आपण महिलावर्ग प्रयत्नशील असतात. गुळापासून अनेक गोड पदार्थ तयार केले जातात. तुमच्या आजीकडून गूळ खाण्याचे अनेक फायदे तुम्ही ऐकले असतील. आज आम्ही तुम्हाला गुळाचे फायदे आणि तोटे या दोन्हींबद्दल माहिती देणार आहोत. कारण गूळ खाण्यासाठी चविष्ट तर आहेच पण आरोग्याच्या दृष्टीनेही एक खजिना आहे.
गुळ हा बाजारात सहजपणे उपलब्ध होणार घटक आहे. तसेच त्याची मागणीही जास्त आहे. हिवाळ्यात गूळ शरीरासाठी पॉवर बूस्टर म्हणून काम करतो. तो मानवी शरीराचे नियमन तर करतोच परंतु ते डिटॉक्सिफायही करण्यासही मदत करतो. यामध्ये पाणी, प्रथिने, कर्बोदके, जीवनसत्व बी, लोह आणि फॉस्फरसचे प्रमाण असते. 10 ग्रॅम गुळात सुमारे 38 कॅलरीज असतात. गुळात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. मधुमेहाचे रुग्णही गूळ खाऊ शकतात, पण ते खाण्याचे प्रमाण मर्यादित ठेवावे लागते. गुळ खाण्याचे फायदे
गूळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असून त्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत…
गुळामुळे ऊर्जा वाढते
काही लोकांना सातत्याने थकवा जाणवत असेल किंवा अशक्तपणा आल्यासारखे वाटत असेल तर त्यांनी रोज थोडा गूळ खावा. गूळ पाचक असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे साखर वाढत नाही मात्र एनर्जीची पातळी चांगली ठेवण्यासही मदत होते. पोटाच्या समस्यांसाठी फायदेशीर
पोटाच्या समस्यांसाठी गूळ खूप फायदेशीर ठरतो. जेवणानंतर थोडासा गूळ खाल्ल्याने पोटात गॅस तयार होत नाही. याशिवाय अपचन आणि बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही सुटका होते.थंडीच्या दिवसात गुळाशी संबंधित घरगुती उपाय कोणते?
हिवाळ्यात गुळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरु शकते. गुळाच्या तापमानवाढीच्या प्रभावामुळे सर्दी, खोकला आणि कफपासून आराम मिळतो. गुळाचा उकड करून प्यायल्याने घशाला आराम मिळण्यास मदत होते.
आल्याबरोबर गूळ गरम करून कोमट पाणी पिल्यास घसादुखी आणि जळजळीपासून आराम मिळतो. यामुळे आवाजही चांगला येतो.
सांधेदुखीची समस्या असल्यास आल्यासोबत गुळ खाल्ल्यास फायदेशीर ठरते. आल्यासोबत रोज गुळाचा एक तुकडा खाल्ल्याने सांधेदुखीपासून आराम मिळतो.
त्वचेच्या आरोग्यासाठी गूळ फायदेशीर आहे. रक्तातील हानिकारक घटक काढून टाकण्याचे काम गूळ करतो. तसेच त्वचा स्वच्छ करण्यासाठीही त्याची मदत होते. यामुळे रक्त परिसंचरणही सुधारते.
रोज थोडासा गूळ खाल्ल्याने पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते आणि त्वचेवर चमकही येते.
शरीरात लोहाची कमतरता असल्यास गूळ हा एक बेस्ट आणि उपयुक्त पर्याय ठरू शकतो. गूळ हा लोहाचा चांगला स्रोत असून अॅनिमियाच्या रुग्णांसाठी तो फायदेशीर आहे.
शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठीही गूळ उपयुक्त आहे. गुळामध्ये अँटी-अॅलर्जीक घटक असतात. त्यामुळे दम्याचा त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी गुळाचे सेवन फायदेशीर ठरते.
श्वसनाशी संबंधित आजारांसाठी पाच ग्रॅम गूळ समप्रमाणात मोहरीच्या तेलात मिसळून खाल्ल्यास श्वसनाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो.
एखाद्याचा आवाज कर्कश असेल तर अशावेळी शिजवलेल्या भातात गूळ मिसळून खाल्ल्याने कर्कशपणा दूर होण्याची शक्यता असते. तसेच तुमचा आवाजही खुलू शकतो.
कान दुखत असेल तर गूळफायदेशीर आहे. तुपात गूळ मिसळून खाल्ल्याने कानदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्याची शक्यता असते. कावीळ झाल्यास पाच ग्रॅम कोरड्या आल्यामध्ये दहा ग्रॅम गूळ मिसळून एकत्र खाल्ल्यास खूप फायदा होतो.
महिलांना मासिक पाळीच्या समस्यांमध्ये आराम देण्यासाठीही गूळ खूप फायदेशीर आहे. याच्या नियमित सेवनाने स्मरणशक्ती वाढते आणि मन मजबूत राहण्यास मदत होते.
तुम्हाला भूक न लागण्याचा आजार असेल तर या समस्येवरही गुळ हा मोठा इलाज आहे. गूळ खाल्ल्याने भूक लागते आणि पचनक्रिया सुधारते.
गूळ हा एक चांगला मूड बूस्टर म्हणून काम करतो. त्यामुळे तुमचा मूड आनंदी राहण्यास मदत होते. याशिवाय मायग्रेनच्या समस्येवरही गूळ फायदेशीर ठरू शकतो.
आंबट ढेकर किंवा पोटाच्या इतर समस्यांवरही काळे मीठ गुळामध्ये मिसळून चाटल्याने फायदा होतो असे म्हटंले जाते. याव्यतिरिक्त मज्जासंस्था मजबूत करण्यासाठी ते फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यासाठीही गूळाचा वापर करता येतो. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करून शरीराचे वजन नियंत्रित करता येते.
हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने शरीर उबदार राहते कारण त्याचा प्रभाव उष्ण मानला जातो. पाण्यात विरघळलेला गूळ प्यायल्याने शरीर थंड राहते आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते.
महिलांसाठी फायदेशीर
महिलांना किंवा मुलींना मासिक पाळी दरम्यान पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी गूळ फायदेशीर आहे. कारण त्यात जीवनसत्त्वांचे आणि खनिजांचे प्रमाण अधिक असते. गुळामुळे पचनक्रिया उत्तम राहते. त्यामुळे पीरियड्समध्ये गूळ खाल्ल्याने वेदना कमी होण्याची शक्यता असते