पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. शुक्रवारी (दि. 10) कोथरूडमधील निवासस्थानी अनेक दिग्गज मान्यवरांनी नामदार पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तर शनिवारी सकाळपासून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या. पाटील दरवर्षी आपला वाढदिवस पाश्चात्त्य संस्कृतीला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी राखून साजरा करतात. यंदा त्यांनी आपला वाढदिवस आरोग्यसेवेसाठी समर्पित केला होता.
त्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांनाही आवाहन केले होते की, वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ अथवा भेटवस्तू न देता, आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्णांच्या सेवेसाठी आर्थिक मदत करावी. पाटील यांच्या आवाहनाला कार्यकर्त्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला. भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांनी आरोग्यसेवेसाठी आर्थिक मदतीचे धनादेश त्यांच्याकडे सुपूर्द केले. तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडूनही नामदार पाटील यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, आ. माधुरी मिसाळ, अश्विनी जगताप, भीमराव तापकीर, रवींद्र धंगेकर, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, धीरज घाटे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, हेमंत रासने, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त सोहेल शर्मा, वाहतूक पोलिस, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीपक मानकर, वाहतूक पोलिस आयुक्त विजय मगर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.