अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार,त्यापूर्वी चौकशीत अतिक अहमदने १४ नावांचा खुलासा पोलिसांकडे केला
लखनऊ : गॅंगस्टार अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ अहमद या दोघांचा शनिवारी (ता. १५ एप्रिल) रात्री उशिरा प्रयागराज येथे गोळ्या घालून खून करण्यात आला. हल्ला होण्यापूर्वी पोलिसांच्या (Police) चौकशीत अतिक अहमदने १४ मोठी नावे सांगितली होती.
त्यात पाकिस्तानमधून राजस्थानमार्गे (Rajasthan) शस्त्र पुरविणाऱ्या व्यक्तीचे नावही घेतले होते. त्यातून काही ‘व्हाईट कॉलर’ गुंडांची नावेही पुढे येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश (Uttar pradesh) पोलिसांनी त्या दिशेने वेगवान चौकशी सुरू केली आहे. (Before the attack, Atique Ahmed mentioned the names of 14 people)
प्रयागराजमधील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना अतिक आणि त्याच्या भावावर गोळीबार करण्यात आला. त्यापूर्वी चौकशीत अतिक अहमदने १४ नावांचा खुलासा पोलिसांकडे केला आहे. त्यात मेरठचा माफिया बदनसिंग बद्दो याचेही नाव आहे. यासोबतच अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमच्या लखनऊच्या साथीदाराचाही शोध सुरू आहे, ज्याने ही रक्कम दिली होती.
पाकिस्तानातून राजस्थानमार्गे शस्त्रे पोहोचविणाऱ्या व्यक्तीचे नावही अतिकने सांगितले होते. तो राजस्थानचा रहिवासी आहे. यूपी एसटीएफ आणि एटीएसने त्या दिशेने तपासाचा वेग वाढविला आहे. त्यातून अनेक मोठी नावे समोर येऊ शकतात, काही व्हाईट कॉलरचाही यात समावेश असू शकतो.
अतिक अहमद आणि अशरफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या हल्ल्यात तीन आरोपींशिवाय आणखी दोन सूत्रधारांचा समावेश आहे. पोलिसांना त्याबाबत महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. एफआयआर नोंदविल्यानंतर त्याचा शोध सुरू आहे. दोन अनोळखी व्यक्तीविरुद्धही एफआयआरही दाखल करण्यात आलेला आहे. पोलिस या गोळीबार प्रकरणाचा कसून तपास करत असून आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आलेली आहे.
नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !