ग्रामविकास अधिकाऱ्याने एका महिलेच्या नावावर असलेल्या पत्र्याच्या शेडची नोंद करण्यासाठी 10 हजार रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुरुवारी (दि. 13) रंगेहाथ अटक केली.
विलास तुकाराम काळे (वय 46) असे अटक केलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी 28 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या जागेवर पत्र्याच्या शेडची नोंद आठ अ उताऱ्यावर करायची होती. Kamshet) त्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे कामशेत येथील ग्रामिकास अधिकारी विलास काळे याने 12 हजार रुपये लाचेची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी एसबीकडे तक्रार केली.
एसीबीने गुरुवारी ग्रुप ग्रामपंचायत खडकाळे कामशेत येथे सापळा लावला. विलास काळे याने तडजोड करून तक्रारदार यांच्याकडून 10 हजारांची लाच घेतली. त्यावेळी काळे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. एसीबी पुणे येथील पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे तपास करीत आहेत.
नवगण न्युज च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी येथे🪀क्लिक करा !