एसटी आंदोलनाच्या वेळी त्यांनी वकिलांचा पोशाख परिधान करून आझाद मैदानात डान्स केल्याने ते अडचणीत सापडले आहेत, गुणरत्न सदावर्ते यांनी वकिलीची सनद दोन वर्षांसाठी रद्द करण्यात आली आहे. सुशील मंचरकर यांच्या तक्रारीमुळे ही सनद रद्द करण्यात आली आहे. वकिली करताना त्यांनी अनेकदा नियमांचं उल्लंघन केलं आहे.
बार काऊन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा या संघटनेने सदावर्तेंवर शिस्तभंगाची कारवाई केली आहे. त्या अंतर्गत आता सदावर्ते यांना दोन वर्षे वकिली करण्यास मज्जाव कऱण्यात आला आहे. वकिलांसाठी असलेल्या नियमांचं त्यांनी उल्लंघन केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात त्यांनी वकिलाचा पोशाख घालून नृत्य केल्याने ते अडचणीत आले आहेत.
याच सोबत काळा कोट परिधान करुन त्यांनी हाताला पट्टी बांधून आंदोलनात सहभाग घेतला होता. हे वकिली पेश्याला साजेसं नसल्याचं याचिकाकर्त्याने म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी मराठा आरक्षण, एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन या दरम्यान माध्यमांसमोर चुकीची वक्तव्यही केल्याचं या याचिकेत म्हटलं आहे.