गेवराईताज्या बातम्याबीड जिल्हा

तेलंगाना राज्य कारभाराचा महाराष्ट्रातील राज्यकर्ते बोध घेतील का? – खिजर सौदागर


तेलंगाना राज्य कारभाराचा महाराष्ट्रातील राज्यकर्ते बोध घेतील का? – खिजर सौदागर

गेवराई : महाराष्ट्र राज्या मध्ये सत्ता कुणाची आहे हा सबब महाराष्ट्रातील शेतकरी राजा, मोल मजुरी वर्ग व सुशिक्षित बेकार वर्गासाठी म्हत्वाचा नसुन या ठिकाणी राज्य सत्तेचा वापर करून घेणारे किंवा सत्ता ऊप भोगणारे महाभाग या घटकांसाठी काय करतात. योजना कशा पध्दतीने राबवतात हे म्हत्वाचे असुन सध्या भारत राष्ट्र किसान समितीच्या पदाधिकाऱ्यांकडुन सोशल मीडियावर एक पोष्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असुन त्या पोष्ट मध्ये महाराष्ट्रातील आमदार व खासदारांना तेलंगणा राज्याचा विकासात्मक दर्जा पाहणी करण्यासाठी आव्हान करण्यात आल्याचे दिसून येत असून या पोष्ट मध्ये भारत राष्ट्र किसान समितीचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष माणिकराव कदम यांनी लिहले आहे की
”महाराष्ट्र राज्यातील सर्व खासदार आमदार महोदय यांना माझ आव्हान आहे तेलंगणातील विकासात्मक मॉडेल बघायच असेल तर या सगळ्या नेत्याची व्यवस्था करतो आणि मग आतापर्यंत तुम्ही कसे महाराष्ट्र राज्यातील जनतेला फसवून मतदान घेण्यासाठीच वापर करतोय हे जाहीर
करा!
चांगल्या हॉटेल राहायची व्यवस्था करण्यात येईल तुम्हास येण्याची जाण्याची व्यवस्था करतो. चला कधी येताय सांगा खुल आव्हान आहे माझे” या पद्धतीची सोशल मीडिया वरील पोस्ट सध्या ग्रामीण भागात चर्चेचा विषय ठरला आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री यांची महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यात भुतोना भविष्य अशी सभा झाली या सभेला महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग व तरुण वर्गाने मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविल्याचे दिसुन आले होते. त्या आणुषंगाने माणिकराव कदम यांच्या या पोष्टला अधिक महत्व प्राप्त होत असुन त्यांच्या या पोष्टातील आव्हानातुन राज्यातील भ्रष्ट सत्ताधारी कितपत बोध आणुसरण करतात या कडे ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले असल्याचे मत भारत राष्ट्र किसान समितीचे खिजरभाई सौदागर, वचीष्ट बेडके, रमेश नाटकर, जयदेव शिगणे यांनी व्येक्त केले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *