भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज,पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराची पाकला मोठी किंमत चुकवावी लागेल
नवी दिल्ली: भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहे, आम्हाला प्रतिक्षा आहे केवळ सरकारच्या आदेशाची. त्यामुळे सरकारने असा कोणताही निर्णय घेतल्यास त्याची पूर्तता करण्यास भारतीय सज्ज आहे, अशा विश्वास भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे जनरल कमांडिंग ऑफिसर (जीसीओ) लेफ्टनंट जनरल एडीएस औजला यांनी व्यक्त केला आहे
नवगण न्युज वर प्रेस करून ज्वाईन करा वॉट्सअप्प ग्रुप
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह श्रीनगर येथे शौर्य दिनाच्या कार्यक्रमात पाकिस्तानला कठोर शब्दात इशारा दिला होता. ते म्हणाले होते, २२ फेब्रुवारी १९९४ रोजी भारतीय संसदेने केलेल्या ठरावानुसार भारताची उत्तर मोहिम ही गिलगिट – बाल्टिस्तान मुक्त करूनच थांबणार आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील भारतीयांवर होणाऱ्या अत्याचाराची पाकला मोठी किंमत चुकवावी लागेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
नवगण डोअर बीड वर प्रेस करून पहा सुंदर डोअर डिझाईन
त्याविषयी बोलताना लेफ्टनंट जनरल एडीएस औजला म्हणाले, केंद्र सरकार जेव्हाही असो कोणता निर्णय घेईल आणि तसा आदेश सैन्याकडे येईल; त्यावेळी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज असेल. भारतीय सैन्यास केवळ आदेशाची प्रतिक्षा आहे. अशा परिस्थितीचा समर्थपणे सामना करण्यासाठी भारतीय सैन्याने पारंपरिक ताकदीसह आधुनिक तंत्रज्ञानाने बळकट केले आहे. गेल्या ७५ वर्षांमध्ये भारतीय लष्कराच्या क्षमतांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. ज्यावेळी क्षमता प्रदर्शित करण्याची वेळ येईल, त्यावेळी भारतीय लष्कराचा प्रभाव दिसून येईल, असेही लेफ्टनंट जनरल औजला यांनी म्हटले आहे.
लोकशाही न्युज वर प्रेस करा व पहा ताज्या बातम्या !
युद्धविराम आणि कलम ३७० रद्द केल्यानंतरच्या काश्मीरविषयी बोलताना ते म्हणाले, खोऱ्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष खूप चांगले ठरले आहे. कारण, यावर्षी ३२ वर्षातील सर्वांत कमी घुसखोरी झाली आहे. ऑक्टोबर महिन्यापर्यंत केवळ आठ दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यापैकी ३ जणांना यमसदनी धाडण्यात लष्करास यश आले आहे.