ताज्या बातम्या

बीड बोगस बील सादर,संकल्प कुलकर्णी यांचे तडकाफडकी निलंबन


बीड : बीड जिल्हा परिषदमधील लेखा विभागातील वरिष्ठ सहाय्यकाने मेडिकलचे बोगस बील सादर केले होते. याचा अहवाल संशयास्पद वाटल्याने सबंधित रुग्णालयाकडे चौकशी केली असता ते बोगस असल्याचे स्पष्ट झाले.

यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी संकल्प कुलकर्णी यांना निलंबीत केले.

याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्हा परिषदेच्या लेखा विभागात संकल्प कुलकर्णी हे वरिष्ठ सहाय्यक लेखा म्हणून कार्यरत आहेत. कुलकर्णी यांनी काही दिवसांपुर्वी शास्वत हॉस्पिटल पुणेचे मेडीकल बील सादर केले होते. सदरील बील संशयास्पद वाटल्याने जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव पडताळणी करिता पाठवला. दरम्यान पुणे येथील शास्वत हॉस्पिटलकडे चौकशी केली असता संबंधित बील हे संकल्प कुलकर्णी यांचे नव्हे तर त्यांच्या भावाचे असल्याचे स्पष्ट झाले. हे बील 1 लाख 10 हजार रूपयांचे असल्याचे समजते. यात संकल्प कुलकर्णी हे दोषी आढळल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अजीत पवार यांनी संकल्प कुलकर्णी यांना तडकाफडकी निलंबीत केले. इतर विभागातील आणखी तिघांना वेगवेगळ्या कारणांसाठी निलंबीत केल्याचे देखील प्राथमिक माहिती आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *