धावत्या स्कूटीच्या हेडलाइटमधून अचानक घोणस जातीचा विषारी साप बाहेर आला. मात्र, दुचाकीचालकाने सावधानता बाळगत स्कूटी थांबवून लाेकांच्या मदतीने सापाला बाहेर काढले. दुचाकीचालकाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. हा प्रकार तालुक्यातील आडस येथे शुक्रवारी सकाळी घडला. आडस येथील पुरुषोत्तम तागड यांची स्कूटी (एम एच १२ एल आर ७७७९) गुरुवारी रात्री घराबाहेर उभी केली होती. शुक्रवारी सकाळी तागड यांच्याकडे चालक म्हणून असलेले अभिषेक लाखे हे त्यांच्या स्कूटीवर शेतातून दूध काढून आणण्यासाठी जात होते.
बीड : बीड जिल्हामध्ये केज येथे एक धक्कादायक घटना पुढे आलीयं. अभिषेक लाखे हे दूध आणण्यासाठी शेतात गेले होते.
त्यांनी गोट्याच्या बाजूला स्कुटी उभी केली होती. साधारणतः अर्ध्या तासानंतर ते दूध घेऊन घराकडे निघाले. एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या स्कुटीमधून साप बाहेर आला. सुरुवातीला साप लहान दिसला, मात्र गाडी थांबविल्यानंतर साप हळूहळू बाहेर आला तेंव्हा साप मोठा असल्याचे दिसून आले. बीडच्या या घडनेची चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे. साप स्कुटीमध्ये नेमका गेला कसा हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित केला.