आष्टीताज्या बातम्याबीड जिल्हा

तहसिल प्रशासनाची दिरंगाई लेखी आश्वासन देऊनही रस्ता मिळेना


तहसिल प्रशासनाची दिरंगाई
लेखी आश्वासन देऊनही रस्ता मिळेना
वाळुंज येथील शेतकऱ्यांचे पुन्हा आमरण उपोषणरस्ता होईपर्यंत उषोषण मागे न घेण्याचा उपोषणकर्त्यांचा निर्धार

आष्टी : तालुक्यातील वाळुंज येथील नंबर बांधावरून रस्ता मिळण्यासाठी शेतक-यांनी २ महिन्यांपूर्वी उपोषण केले होते.यावेळी तहसिलदार यांना ३ ते ५ दिवसांत प्रश्न मार्गी लावू असे लेखी आश्वासन देऊनही २ महिने उलटले तरी तहसिल प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नसून खरीप पेरणीचे दिवस तोंडावर आले असून तात्काळ रस्ता द्यावा या मागणीसाठी शेतक-यांना दि.२ जून रोजी आमरण उपोषण तहसिल कार्यालयासमोर सुरू केले आहे.

तालुक्यातील वाळुंज येथील सर्व नंबर बांधावरून रस्ता देण्यात यावा अशी मागणी शेतकरी अनेक दिवसांपासून करत असून अनेकवेळा उपोषण केले प्रशासनाने लेखी देऊनही रस्ता मिळत नसल्याने शेतक-यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.महसुल प्रशासन दिरंगाई करत असल्याचा आरोप शेतक-यांनी केला आहे.शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले आहे.पेरणी काही दिवसांवर आली असून शेती कशी कसावी हा विचार शेतक-यांना भेडसावत आहे.रस्ता मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा निर्णय उपोषणकर्तांनी घेतला आहे.यावेळी उत्तम शिंदे,अशोक जगताप,पप्पु बेग,बाळासाहेब शिंदे,रामदास शिंदे,आजिनाथ शिंदे,डिगंबर शिंदे,मोहन शिंदे,आदी शेतकरी उपस्थित होते.या उपोषणास भाजपचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,आजिनाथ गळगटे,मा.सरपंच जालिंदर गायकवाड,अहमद पठाण,एन डी पवळ यांनी पाठींबा दर्शविला


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *