राज ठाकरे यांच्या भूमिकेला भाजपचा वाढता पाठिंबा आणि हिंदुत्वाचा मुद्यावरून उत्तर भारतीयांचे राज ठाकरेंना वाढते समर्थन पाहता मनसे- भाजप युतीच्या चर्चा राजकीय वर्तुळापासून सर्वसामान्यांपर्यंत सुरु झाल्या आहेत.
तर दूसरीकडे मनसे ही भाजपचीच टीम असल्याचा विरोधकांचा आरोप आता सत्यात उतरणार का असा सवालही उपस्थित होत आहे.
राज्यात सध्या चर्चा आहे ती फक्त मनसे (Mns) आणि राज ठाकरेंचीच (Raj Thackeray )… राज ठाकरेंच्या औरंगाबादल्या सभेने राजकारणातलं वातावरण टाईट केलं आहे.सगळीकडे या सभेचा मोठा बोलबाला आहे. मात्र अशातच गेल्या अनेक दिवसांपासू सुरू असलेल्या मनसे- भाजप (MNS-BJP Alliance) युतीच्या चर्चा पुन्हा जोर धरू लागल्या आहेत. गुढी पाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदललेला गिअर आणि घेतलेली हिंदुत्वाची भूमिका सध्या गाजत आहे. या भूमिकेला भाजपचाही भरभरून पाठिंब मिळत आहे. अशातच आता मुंबई महापालिकेसह राज्यातल्या इतर मोठ्या महापालिका निवडणुकांच्या निवडणुका लागत आहेत. त्यामुळे मनसेच्या इंजिनवर सवार होऊन भाजप कमळ फुलवण्याचा प्रयत्न करेल अशा चर्चा सुरू आहेत