Navgan News

ताज्या बातम्या

ऊसाच्या शेतात गांजाची लागवड


बीड: तलवाडा गावात शेतकऱ्याने अनोखी शक्कल लढवली आहे. ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजाची लागवड करुन दुहेरी उत्पादन घेणाऱ्या एका शेतकऱ्यावर, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करत लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे.गेवराई तालुक्यातील तलवाडा शिवारात बाळू अंकुश खवाटे यांची शेती आहे. त्यांनी ऊसात गांजाची झाडे लावली

सध्या ती डोक्याऐवढी असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड यांना मिळताच, त्यांनी नायब तहसीलदार प्रशांत जाधवर, तलवाडा ठाण्याचे सपोनि प्रताप नवघरे यांना सोबत घेऊन पथकासह खवाटे याच्या शेतात धाड टाकली. यावेळी ऊसाच्या शेतात ठराविक अंतरावर 5 ते 6 फुटांची गांजाची झाडे आढळून आले. दरम्यान तब्बल 18 किलो गांजा पोलिसांनी जप्त करत आरोपी बाळू खवाटे याला ताब्यात घेतले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *