आज जे वीज संकट या देशात निर्माण झालंय. ते फक्त कोळशामुळं निर्माण झालं आहे. कोरोना संपला आणि सर्व जण कामाला लागले, त्यामुळं विजेची मागणी वाढली, सणासुदीचा काळ आणि तापमानात वाढ झालीय, त्यामुळं सुद्धा वीज संकट निर्माण झालंय, मागणी आणि पुरवठयामध्ये तफावत निर्माण झालीय.तसेच राज्यातील काही ठिकाणीच भारनियमन करण्याचा आमचा मानस आहे असे राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी भारनियमनावर सांगितले.
ज्या ठिकाणी वीजेचे नुकसान आहे, वीज चोरी आहे, त्याठिकाणीचं भारनियमन करण्याचा आमचा मानस आहे, सामान्य नागरिकांना आम्ही भारनियमनचा त्रास देणार नाही, विजेचे बिल भरलेच पाहिजे, विजेची तूट भरुन काढण्याचा आमचा प्रयत्न आहे, ग्राहकांनाही काटकसर करावी, सर्व सोंग करता येते मात्र पैशाचे सोंग करता येते, असे आवाहन उर्जामंत्र्यांनी जनतेला केले आहे. महाराष्ट्रातील 2.8 कोटींहून अधिक ग्राहकांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणने मंगळवारपासून राज्यातील काही भागात लोडशेडिंग जाहीर केले. मात्र या उन्हाळ्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईला याचा फटका बसणार नाही. असे देखील महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.