नवी दिल्ली : खाजगी लसीकरण केंद्रांवर आता 18 वर्षांवरील व्यक्तींसाठी कोरोनाचा प्रिकॉशनरी डोस दिला जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
10 एप्रिलपासून हे डोस उपलब्ध होणार आहेत, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या डोससाठी मोफत लसीकरण कार्यक्रम, तसेच सरकारी लसीकरण केंद्रांवर आरोग्य सेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना प्रतिबंधात्मक डोस देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार असून, त्याला आणखी गती दिली जाणार आहे, असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या भारतामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स, सहव्याधी असलेल्या आणि वय वर्षे 60 वरील नागरिकांना कोरोनाचा तिसरा डोस दिला जात आहे.