शिक्षणविभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे न्यायमंत्र्याचा बीड जिल्हा बदनाम-विवेक कुचेकर
शिक्षणविभागाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे न्यायमंत्र्याचा बीड जिल्हा बदनाम अबब…तब्बल चार वर्षे शिक्षकाचे वेतन मुख्याध्यापकाने ठेवले स्वतःच्या खात्यात.
बीड : तालुक्यातील पिंपळगाव वाढवाणा येथील खाजगी शिक्षण संस्था भाई उद्धवराव पाटील माध्यमिक विद्यालयातील अनाधिकृत मुख्याध्यापक विनयकुमार केंडे याचे अनेक कारनामे दिवसेंदिवस समोर येत असून काही आर्थिक व्यवहारात अनेकांना फसवल्याचे उघडपणे बोलले जात आहे. तसेच एका सहशिक्षकाचे थकीत वेतन तब्बल चार वर्षे स्वतःच्या संयुक्त खात्यात जमा ठेवून पैस्याची मागणी करत असल्याची तक्रार दिली आहे. त्या शिक्षकाने केंडेला लाच दिली नाही म्हणून लाचखोर केंडेंनी त्या गरीब शिक्षकाच्या खात्यात थकीत वेतन अद्याप जमा केले नाही. अश्या एक नाही अनेक प्रकरणे विनयकुमार केंडे यांनी केल्याचे उघड झाले असून याकडे जिल्हा शिक्षण विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असून शिक्षण विभागाने फक्त शाळेचे वेतणेत्तर अनुदान बंद करून केंडेला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप प्रा,शिवराज बागंर पाटील युवा मंच संस्थापक अध्यक्ष विवेक कुचेकर यांनी केला आहे. लबाड अनाधिकृत मुख्याध्यापकावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न बीड जिल्ह्यातील शिक्षणतज्ञ माध्यमिक शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांना विचारणार असून शिक्षणाधिकारी यांच्या बोटचेपी धोरणामुळे मात्र बीड जिल्हा बदनाम होत असून न्यायमंत्र्याच्या जिल्ह्यात शिक्षकावरील अन्याय उघड्या डोळ्याने जनता पाहत आहे.
बीड जिल्ह्यातील अनेक खाजगी शिक्षण संस्थेचे शिक्षक जाहीरपणे विनयकुमार केंडे याचा शिक्षण क्षेत्रातील पाडा वाचत असून अनेकांना फसवल्याचे अनेक प्रकरणे माहितीच्या अधिकारात मागवले गेलेले आहेत परंतु केंडेने माहितीच्या अधिकारात मागावलेली माहिती अद्याप कोणालाही दिलेली नाही. केंडेचा आता पापाचा घडा भरला असून अनेक प्रकरणात केंडेचा हात असून लाचखोर मुख्याध्यापकांवर कारवाई कधी होणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील जनता विचारत आहेलवकरात लवकर भ्रष्टाचारी मुख्याध्यापक विनयकुमार केंडे यांच्यावरती कारवाई करण्यात यावी नसता प्रा,शिवराज बागंर पाटील युवा मंचच्या वतीने ञीव स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा प्रा.शिवराज बागंर पाटील युवा मंच संस्थापक अध्यक्ष विवेक कुचेकर यांनी दिला आहे.
.