
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडीनं जोर धरलेला पहायला मिळाला. ऐन थंडीतही पावसानं जोरदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांचे भरपूर नुकसान झालं. थंडीची लाट सुरु असतानाही अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.
या बदलांमुळे अनेकांचं नुकसान झाल्याचं चित्र आहे. अशातच काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पु्न्हा एकदा पाऊस (Rain) कोसळणार असल्याचं हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलं आहे.
येत्या सहा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता आहे. हा जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्र, नाशिक, खान्देश तसेच विदर्भात ढगाळ वातावरण राहणार आहे. या भागात काही तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता आहे. त्यामुळे थंडीचाही दोर वाढण्याची शक्यता आहे.
अजूनही कडाक्याची थंडी आहे. त्यामुळे काही ठिकाणी गारपीटदेखील होण्याची शक्यता आहे. नागरिकांना सतर्क राहण्यासाठी सांगितलं जात आहे.
दरम्यान, वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे हवामान बदलल्याचं चित्र पहायला मिळत आहे. यामुळे अनेक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वातवरणातील बदलांमुळे कधी काय होईल याचा नेम नाही.