शिक्षकांना सलाम करणारी मुंबई उपनगरातील सर्वात मोठी मानाची ‘सन्मान दहीहंडी 2026’; 11 लाख 11 हजार 316 रुपयांचं पारितोषिक

मुंबई: शिवसेना पुरस्कृत आणि शिवसेना नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली ‘किरण भाऊ लांडगे मित्र परिवार’ आयोजित भव्य “सन्मान दहीहंडी 2026” चे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्षीची दहीहंडी अत्यंत विशेष असून ही शिक्षकांना सलाम करणारी आणि समर्पित असणारी पहिलीच मानाची दहीहंडी ठरणार आहे. या सोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. गोविंदा पथकांसाठी रुपये 11 लाख 11 हजार 316 रुपयेचे भव्य पारितोषिक ठेवण्यात आले आहे. शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या आणि ज्ञान व यशाची उंच गुढी उभारणाऱ्या या दहीहंडी उत्सवाला नागरिकांनी व गोविंदा पथकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगरसेवक किरण भाऊ लांडगे यांनी केले आहे.
कसा असेल कार्यक्रम-
कार्यक्रम तपशील (Event Details):
दिनांक: शनिवार, 5 सप्टेंबर 2026
वेळ: दुपारी 1 वा. ते रात्री 10 वा.
स्थळ: नगरसेवक किरण भाऊ लांडगे जनसंपर्क कार्यालय, असल्फा, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई.
आयोजक: किरण (भाऊ) लांडगे मित्र परिवार व शिवसेना
प्रमुख उपस्थिती व आकर्षण (Star Celebrities):
या सोहळ्यात मनोरंजन क्षेत्रातील अनेक सुप्रसिद्ध कलाकार व सेलिब्रिटीज विशेष उपस्थिती लावणार आहेत:
- अमृता खानविलकर (सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री)
- Sambata (संबाता) (सुप्रसिद्ध रॅपर)
- आफताब शिवदासानी (हिंदी चित्रपट अभिनेता)
- सोनल चौहान (बॉलिवूड अभिनेत्री)
- श्वेता त्रिपाठी (प्रसिद्ध अभिनेत्री)
- आयेशा खान (अभिनेत्री व मॉडेल)
- कुबेरा सेट (Kubera Set)



