Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

Aadesh Bandekar: भर कार्यक्रमात आदेश बांदेकरांसमोर पुजा बिरारी अन् सोहम आले अन् आदेश भावोजींना अश्रू अनावर; नेमकं घडलं काय?

निर्माते,दिग्दर्शक आणि अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) हे घराघरांत त्यांच्या ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे लोकप्रीय आहेत. अनेक वर्षांच्या ब्रेकनंतर पुन्हा एकदा ‘आदेश भावोजींची’ ‘दार उघड बये दार उघड’ हाक प्रेक्षकांना ऐकू येणार आहे.

या कार्यक्रमाचं शुटिंग सुरू झालं. पण या कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये आदेश बांदेकरांना एक खास सरप्राईज मिळालं. ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रम सुरू असताना, आदेश भाऊजींसमोर अचानक लेक सोहम बांदेकर आणि सून पूजा बिरारी आले. दोघांना एकत्र पाहून – भेटून आदेश बांदेकरांना अश्रू अनावर झाले होते. या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

नेमकं काय घडलं?

आदेश बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्यातला बॉंड कायम चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी, दिलेल्या एका मुलाखतीत आदेश बांदेकर जुने विषयी भरभरून बोलले होते.सासरा कमी आणि बाबा जास्त झालोय.घरी मुलगी येण्याचा आनंद किती वेगळा असतो हे नव्याने अनुभवत असल्याचं ते म्हणाले होते. दरम्यान होम मिनिस्टर कार्यक्रमाचं शूटिंग सुरू असताना या कार्यक्रमाच्या ठिकाणी आदेश बांदेकर यांना मुलगा सोहम आणि सून पूजाची अचानक एन्ट्री झाली.

आदेश बांदेकरयांना पाहताच पूजा त्यांना भेटली. आदेशजींनीही लेकीप्रमाणे पूजाला जवळ घेतलं. पूजा आणि सोहम आदेशजींच्या पाया पडले. त्यानंतर उपस्थित लोकांना हा क्षण अतिशय भावनिक असल्याचं आदेश भाऊजींनी सांगितलं. अचानक झालेल्या या गोड भेटीमुळे आदेश बांदेकरांच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर “माऊली तुमचा प्रश्नाचे उत्तर -डोळ्यातून पाणी कसं आलं …”असं म्हणताना ते दिसतात. बांदेकर कुटुंबाच्या या गोड भेटीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. चाहते या व्हिडिओ खाली आदेश बांदेकर आणि पूजा बिरारी यांच्यात मुलगी आणि वडील यांच्यातच असा बॉण्ड असतो तसाच असल्याचं म्हटलं.

“सासरा कमी बाबा जास्त झालोय”

अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत, आदेश बांदेकर यांनी पूजा बिरारी ही बांदेकर कुटुंबाची सून नसून आमची मुलगीच असल्याचं सांगितलं. ते म्हणाले ‘मी सासरा कमी आणि बाबा जास्त झालो आहे.घरात मुलगी येण्याचा आनंद किती वेगळा असतो,हे आता नव्याने अनुभवतोय.आमच्या घरी सुचित्रा आली,तेव्हाही तसंच झालं होतं. आज पुन्हा तीच भावना अनुभवायला मिळते आहे. प्रत्येक घरात मुलगी असावी..कारण तीच घरातल्या नात्यांना नवा अर्थ देते.पूजा ही माझी लाडाची मुलगी आहे.’ असं ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *