Navgan News



Add Space

ताज्या बातम्या

धावत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; मोदींच्या काळात दिल्लीत पुन्हा निर्भया कांड, ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक

देशाला हादरवून टाकणाऱ्या निर्भया कांडासारखी भयंकर घटना मोदी सरकारच्या राजवटीत घडली आहे. धावत्या बसमध्ये एका 17 वर्षांच्या विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणी बसचा ड्रायव्हर आणि कंडक्टरला अटक करण्यात आली आहे.

या घटनेमुळे राजधानीतील महिलांची सुरक्षा आणि दिल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह लागले आहे.

पीडित मुलगी ही उत्तर प्रदेशच्या मैनपुरी जिह्यातील आहे. ती नोएडा येथील आपल्या नातलगाच्या घरी जाण्यास निघाली होती. मुसळधार पाऊस आणि काळोखामुळे ती रस्ता चुकली आणि ग्रेटर नोएडा येथील परी चौकात आली. त्याचवेळी एक रिकामी स्लीपर बस तिथून जात होती. एकटी मुलगी पाहून ड्रायव्हरने बस थांबवली. आम्ही नोएडा सेक्टर 63 च्या दिशेने जात आहोत, तुला तिथे सोडतो असे सांगून त्यांनी तिला बसमध्ये घेतले. बस सुरू होताच कंडक्टरने तिच्यासोबत अश्लील चाळे सुरू केले. त्यानंतर ड्रायव्हर आणि कंडक्टरने तिच्यावर बलात्कार केला. कोणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.

नराधम आरोपींनी नोएडा सेक्टर 63 येथे बस न थांबवता थेट दिल्लीतील काश्मिरी गेट गाठले. तब्बल 47 किलोमीटरचे अंतर या बसने कापले. तेथील रिंग रोडवर पीडित मुलीला सोडून दिले.

पीडितेने धाडस करून काश्मिरी गेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाल करून बसचा शोध घेतला आणि आरोपींना अटक केली. कुलदीप आणि संदीप अशी आरोपींची नावे आहेत. संबंधित बस फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.

25 दिवसांनंतर उघडकीस आली घटना

ही घटना 4 ऑगस्टच्या रात्री साडे अकरा वाजता घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपींना अटक केली. पीडित मुलगी उत्तर प्रदेशची आहे. घटनास्थळही नोएडात आहे. मात्र 25 दिवस उलटूनही दिल्ली पोलिसांनी याबाबत नोएडा पोलिसांना कळवले नाही किंवा हे प्रकरण चौकशीसाठी नोएडा पोलिसांकडे सोपवले नाही. त्यामुळे संशय व्यक्त होत आहे. नोएडा व दिल्ली पोलिसांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *