Navgan News



Add Space

आंतरराष्ट्रीयताज्या बातम्यानवगण विश्लेषणराष्ट्रीय

चीन, पाकिस्तानच्या नाकावर टिच्चून मित्र भारतासाठी रशियाचा सर्वात मोठा निर्णय…

चीन आणि पाकिस्तानचं टेन्शन वाढवणारी बातमी आहे. रशियाने पुन्हा एकदा भारतासोबतची आपली मैत्री किती पक्की आणि जुनी आहे, याचा प्रत्यय दिला आहे. रशियाने भारताला एस S400 सुदर्शन वायू रक्षा प्रणालीचे आणखी पाच स्क्वाड्रन देण्याचा मोठा प्रस्ताव दिला आहे.

हा प्रस्ताव 50000 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचा असल्याची माहिती समोर येत आहे. ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानी विमानांना यशस्वीपणे रोखणाऱ्या या यंत्रणेचे अतिरिक्त युनिट पूर्व आणि पश्चिम आघाडीवर तैनात करण्यात येणार आहेत. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रस्तावावर सध्या विचार सुरू आहे. भारताने या यंत्रणेसाठी दाखल केलेल्या निविदावर रशियाकडून उत्तर आलं असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

 

भारताने 2018 पूर्वी ऑर्डर केलेले पाच एस -400 स्क्वाड्रोन पैकी चार भारताला यापूर्वीच मिळाले आहेत. तर आणखी एक स्क्वाड्रनची डिलिव्हरी या वर्षाच्या नोव्हेंबरपर्यंत मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे नव्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पुढील तीन वर्षानंतर त्याची डिलव्हरी सुरू होणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवलं, यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून अनेक दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास 100 हून अधिक दहशतवादी मारले गेले आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर भारताने लगेचच एस S400 सुदर्शन वायू रक्षा प्रणालीचे आणखी पाच स्क्वाड्रन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला आता अंतिम स्वरुप प्राप्त होण्याची शक्यता आहे. सर्व गोष्टी योग्य झाल्या तर पुढील तीन वर्षानंतर भारताला त्याची डिलव्हरी मिळू शकते.

 

दरम्यान भारताला संकट काळात रशियाने वेळोवेळी मदत केली आहे. रशिया भारताला स्वस्तात कच्च्या तेलाचा पुरवठा करत होता. ऊर्जेच्या गरजेसाठी भारत मोठ्या प्रमाणात रशियावर अवलंबू आहे. मात्र अमेरिका आणि इराण युद्ध सुरू झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झालं. स्ट्रेट ऑफ होर्मूज बंद झाल्यानंतर रशियाने भारताला जी कच्च्या तेलात सवलत दिली होती, ती बंद केली. भारताला रशियाकडून अधिक दराने कच्च्या तेलाची खरेदी करावी लागली. मात्र तरी देखील रशियाने पुरवठा मात्र सुरळीत ठेवला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *