Navgan News

क्राईममहाराष्ट्र

मारेकऱ्यांचा ‘परफेक्ट’ प्लॅन, पण अशी झाली गडबड? भीमा नदीत सापडला साडीने गुंडाळलेला मृतदेह; नेमकं काय घडलं?


दौंड: पुणे जिल्ह्याला (Daund News) हादरवून सोडणारी एक अत्यंत निर्घृण घटना दौंड शहरात उघडकीस आली आहे. भीमा नदीच्या पात्रात एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुरावा नष्ट करण्यासाठी मारेकऱ्यांनी वापरलेली क्रूर पद्धत पाहून पोलीसही चक्रावले आहेत.

शनिवारी भीमा नदीवरील रेल्वे पुलाजवळ नागरिकांना एक मोठे गाठोडं तरंगताना दिसलं. सुरुवातीला तो कचरा असावा असं वाटलं, पण संशय बळावला आणि पोलिसांनी याबद्दल माहिती देण्यात आली, पोलिसांनी तपासणी केली असता, त्यात एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. मारेकऱ्यांनी खुनानंतर कमालीची खबरदारी घेतली होती. त्यांनी मृतदेह आधी प्लास्टिकच्या ताडपत्रीत आणि नंतर पोत्यात घट्ट गुंडाळला होता. हे गाठोडं सुटू नये म्हणून त्यावर एका साडीने मजबूत गाठी मारल्या होत्या. हे पाहून हा खून गुन्हेगाराने थंड डोक्याने केल्याचे स्पष्ट होत आहे.

 

मयत तरुणाची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. मात्र, त्याच्या उजव्या हातावर ‘त्रिशूळ’ गोंदलेले आढळले आहे. तपासाची हीच पहिली पायरी ठरण्याची शक्यता आहे. मारेकऱ्यांनी हा मृतदेह रेल्वे पुलावरून नदीत फेकला असावा, जेणेकरून तो वाहून जाईल किंवा कुजल्यामुळे ओळख पटणार नाही, असा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, याप्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *