
ब्रिटीशांनी 150 वर्षे भारतावर राज्य केले. या काळात शेतकरी, कामगार, व्यापारी आणि प्रत्येक जाती आणि धर्माच्या लोकांना त्रास सहन करावा लागला. मात्र एका राज्यावर इंग्रज राज्य करू शकले नाहीत.
भारतात एक राज्य असे आहे, ज्याला इंग्रज कधीही गुलाम बनवू शकले नाहीत. या राज्याने कधीही ब्रिटीश राजवटीला आपल्या भूमीवर पाऊल ठेवू दिले नाही. याबाबत बऱ्यात लोकांना माहिती नाही.
भारतातील या राज्याचे नाव गोवा आहे. गोव्याचा इतिहास खूप रंजक आहे. या राज्यावर कधीही ब्रिटीशांती राजवट नव्हती. यामागे काय कारण आहे ते आपण जाणून घेऊयात.
याचे कारण म्हणजे गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. पोर्तुगीज इंग्रजांच्या आधी भारतात आले. त्यांनी भारतात सागरी व्यापार आणि शक्ती वाढवायला सुरुवात केली. 1540 मध्ये पोर्तुगीजांनी गोव्यावर नियंत्रण मिळवले.
इंग्रजांनी पोर्तुगीजांकडून गोवा जिंकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश मिळाले नाही. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. 1961 मध्ये गोवा भारतात सामील झाला.






