भारताचा अमेरिकेला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका, तब्बल 24 देशांसोबत भारताने..

अमेरिकेने भारतावर लावलेल्या 50 टक्के टॅरिफनंतर भारताच्या काही क्षेत्रात मोठा फटका बसल्याची वस्तूस्थिती असून भारतापेक्षा अधिक अमेरिकेला याचा जास्त फटका बसला. अमेरिकेतील बाजारपेठेतील वस्तूंचे भाव कमी निर्यातीमुळे गगणाला पोहोचली आहेत.
आता नुकताच खळबळ उडवणारी आणि विशेष: डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारी आकडेवारी पुढे आली. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताचे नुकसान होण्याऐवजी फायदा झाला. चीन आणि अमेरिकेतील व्यापारामुळे केवळ भारताचे नुकसान झाले नाही तर जगभरातील पुरवठा साखळीही विस्कळीत झाल्या. यादरम्यानच भारताने याच संधीचा फायदा घेत तब्बल 24 देशांसोबत मोठा करार केला. जगातील नवनवीन बाजारपेठ भारताने शोधल्या आहेत.
अमेरिकेला भारताचा सर्वात मोठा पहिला झटका
अमेरिकेने लावलेल्या टॅरिफनंतर भारताने मुक्त व्यापार करार करण्यास सुरूवात केली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भारतीय निर्यातदारांनी 24 देशांना निर्यातीत सकारात्मक वाढ दिली. संयुक्त अरब अमिराती, जर्मनी, टोगो, इजिप्त, कोरिया, व्हिएतनाम, इराक, मेक्सिको, रशिया, केनिया, नायजेरिया, कॅनडा, पोलंड, ओमान, थायलंड, बांगलादेश, ब्राझील, बेल्जियम, इटली टांझानिया आणि श्रीलंका यांचा समावेश आहे.
अमेरिकेच्या टॅरिफनंतर भारताने केला तब्बल 24 देशांसोबत व्यापार
अमेरिकेत कमी झालेल्या निर्यातीनंतर हे पाऊस भारताने उचलले. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या सहामाहीत या 24 देशांना एकूण 129.3 अब्ज डॉलर्सची निर्यात झाली, जी गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत सकारात्मक वाढ दर्शवते, जी भारताच्या एकूण निर्यातीच्या 59 टक्के आहे. यामुळे भारताला अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा फार काही परिणाम जाणवला नाही.
आकडेवारी पुढे डोनाल्ड ट्रम्प यांना झटका
नुकताच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला मोठा इशारा देत म्हटले की, त्यांनी जर रशियाकडून तेल खरेदी बंद केली नाही तर त्यांच्यावर अधिकचा अजून टॅरिफ लावला जाईल. 50 टक्के टॅरिफ लावल्यानंतर अमेरिकेत होणारी जवळपास 70 टक्के निर्यात भारताने बंद केली. त्यामुळे पुढे अजून अमेरिकेने भारतावरील टॅरिफ वाढवला तरीही फार काही परिणाम त्याचा भारतावर होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.