
Dhanteras Shopping Tips: धनत्रयोदशी किंवा धनतेरस हा सण दिवाळीच्या दुसरा दिवशी साजरा केला जातो. यंदा तो १८ ऑक्टोबर, शनिवार रोजी येत आहे. विशेष म्हणजे, १९ ऑक्टोबर (रविवारी) या दिवशी त्रयोदशी तिथी असल्यामुळे, खरेदीसाठी शुभ मुहूर्त दोन्ही दिवशी उपलब्ध आहे.
हिंदू धर्मात धनत्रयोदशीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान धन्वंतरि, माता लक्षमी आणि कुबेर देवता यांची पूजा केली जाते. असे मानले जाते की या दिवशी काही विशिष्ट वस्तू घरात आणल्यास केवळ सुख-शांती आणि समृद्धी प्राप्त होतेच, पण दुर्भाग्य दूर होऊन घरात धन- धान्याची भरभराट होते.
चला तर मग, जाणून घेऊया अशा ७ शुभ वस्तू ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी घरात आणल्याने लक्ष्मीमातेचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतो.
धणे
धनत्रयोदशी धणे विकत घेण्याची परंपरा आहे. हे धणे लक्ष्मीला अर्पण करून त्यातील काही बीज मातीमध्ये पेरा. असं मानलं जात की, जर त्या बियातून रोप उगवलं, तर पुढील वर्षभर घरात सुख, समाधान आणि आर्थिक समृद्धी नांदते.
बताशे
गोड बताशे हे लक्ष्मी देवीचं प्रिय दैवेद्य मानलं जातं. धनतेरसच्या दिवशी पूजेसाठी बताशे आणा आणि देवीला अर्पण करा. असं केल्याने घरातील सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतात आणि घरात शुभ घटनांना सुरुवात होते.
सुपारी
धनतेरसच्या पूजेमध्ये सुपारी आवश्यक मानली जाते. शास्रानुसार सुपारी म्हणजे यम, इंद्र, ब्राह्य आणि वरुण देवतांचं प्रतीक आहे. पूजेनंतर ती सुपारी तिजोरी ठेवावी, ज्यामुळे घरात पैशांची तंगी भासत नाही.
पितळेची भांडी
जर तुम्ही या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करू शकत नसाल, तर त्याऐवजी पितळेची भांडी किंवा कोणतीही वस्तू खरेदी करा. पितळी हे शुभ धातू मानलं जातं आणि यामुळे घरात सकारात्मकता आणि लक्ष्मीचे वास होते.
झाडू
धनतेरसच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करणं शुभ मानलं जातं. कारण झाडू ही लक्ष्मी देवीचं रूप मानली जाते. नवीन झाडूने घर स्वच्छ केल्याने फक्त घाणच नाही, तर आर्थिक संकटं आणि नकारात्मकता देखील दूर होते
कपूर
धनतेरसच्या दिवशी कपूर विकत घेऊन, त्याने लक्ष्मी, कुबेर आणि धन्वंतरि देवांची पूजा करावी. यामुळे घरात साठलेली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. कपूरची सुगंधी ज्योत वातावरण पवित्र करते आणि मन शांत ठेवते.
पानाचे पान
धनतेरस किंवा दिवाळीच्या पूजेमध्ये पानाचे पान वापरणं अनिवार्य मानलं जातं. पानामध्ये देवी-देवतांचा वास असल्याचं शास्त्रात सांगितलं आहे. त्यामुळे या दिवशी पान विकत घेऊन पूजेमध्ये समाविष्ट केल्यास देवतेंचा आशीर्वाद लाभतो.
FAQs
1. धनत्रयोदशी दिवशी कोणत्या वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते? (What items are considered auspicious to buy on Dhantrayodashi?)
धणे, सुपारी, बताशे, पितळ भांडी, झाडू, कपूर आणि पान हे सात वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते.
2. पितळ भांडी का खरेदी करावीत? (Why should brass utensils be bought on Dhanteras?)
पितळ हे शुभ धातू मानले जाते आणि यामुळे घरात सकारात्मकता आणि लक्ष्मीचे वास होते.
3. झाडू खरेदी का केली जाते? (Why is broom purchased on Dhanteras?)
झाडू हे लक्ष्मी देवीचं प्रतीक मानलं जातं आणि नवीन झाडू घरातील नकारात्मकता व आर्थिक अडचणी दूर करते.
4. धनतेरसचे धार्मिक महत्त्व काय आहे? (What is the religious significance of Dhanteras?)
या दिवशी भगवान धन्वंतरि, लक्ष्मी माता व कुबेर देवतेची पूजा केली जाते, जी आरोग्य, संपत्ती व समृद्धीचे प्रतीक आहेत.