Navgan News

क्राईम

बँकेत जमा केले ५०० रुपये अन् काढले ५ कोटी..२३ वर्षीय मुलगा बनला कोट्यधीश, पण….


मिठाई आणि नमकीनच्या छोट्या दुकानदाराने बँकेच्या सिस्टमचा फायदा घेऊन लाखो रुपये कसे उधळले याचा धक्कादायक तपास सुरू आहे. फक्त ५०० रुपये जमा करून ५ कोटी रुपये काढणाऱ्या २३ वर्षीय आकाशने कुटुंबाची जबाबदारी सांभाळली होती.

 

पण एका रात्रीतच त्याच्या जीवनात आली ‘लक्झरी’ ची लाट. सोनं, महागड्या गाड्या आणि शेअर बाजारात कोट्यवधी गुंतवणूक हे सगळ एका रात्रीत! हे सर्व कस शक्य झाल? पोलिसांचा तपास उघड करतोय एका धूर्त युक्तीची कहाणी.

 

आकाश हा हाथरस शहरातील माता चामुंडा स्वीट अँड नमकीन दुकान चालवतो. वडिलांच्या निधनानंतर त्याने घराची धुरा सांभाळली. त्याचे मित्र म्हणतात,”आकाश नेहमी साधा, मेहनती होता. कचोरी-समोसा विक्रीतून कुटुंब चालवायचं.” पण मे २०२५ मध्ये एचडीएफसी बँकेत ५०० रुपयांनी खाते उघडलं आणि त्यानंतर सुरू झाली धक्कादायक योजना. प्रथम ५००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट (बँकेची तात्पुरती कर्ज सुविधा) घेतला. छोट्या-छोट्या जमा करून हळूहळू मर्यादा वाढवली आणि नऊ व्यवहारांतून एकूण ५ कोटी रुपये काढले . ते ही फक्त ५०० रुपयांच्या सुरुवातीच्या जमा नोटीस देऊन.

 

शेजारीनी पहिली शंका घेतली जेव्हा आकाशने रात्रीतच जीवनशैली बदलली. २.५ लाखांची यामाहा R15 बाईक विकत घेतली, थार एसयूव्ह बुक केली आणि ३.५ लाखांचं सोनं खरेदी केलं. “कधी कधी दिसायचं ते आता रस्त्यावर थार घेऊन फिरतंय, हातात सोन्याच्या साखळ्या,” असं एका शेजाऱ्याने सांगितलं. संशय वाढला आणि त्यांनी पोलिसांना सूचना दिली. हाथरस पोलिसांनी स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप (एसओजी) ने ताबडतोब तपास सुरू केला. बँक व्यवहारांची छाननी केली तेव्हा उघड झालं. ओव्हरड्राफ्टच्या त्रुटीचा वापर करून आकाशने ५० लाखांपर्यंत एका व्यवहारात पैसे काढले, जमा परत केली नाही.

 

धक्कादायक म्हणजे ३.५ कोटी रुपये आकाशने ऑनलाइन ट्रेडिंग अॅप्सवर शेअर बाजारात गुंतवले. उरलेले पैसे गाड्या, सोनं आणि लक्झरी वस्तूंवर खर्चले. पोलिस म्हणतात, “हे एकटा धूर्तपणा की मोठ्या फसवणुकीचं जाळं? तपासातून अजून बऱ्याच गोष्टी उघड होतील.” आकाशला अटक झाली असून त्याची पूर्ण कबुली अजून जाहीर नाही. याशिवाय तीन बँक कर्मचारींवरही संशय आहे की त्यांनी नियम मोडून मदत केली का? न्यूज18 च्या अहवालानुसार, हा प्रकरण बँकिंग सिस्टममधील कमकुवतपणावर प्रश्नचिन्ह उभं करतोय.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *