आधी जनावरांच्या गोठ्यात बांधले, नंतर केळी, टरबुजाची साली खायला…; गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना

बीड : जिल्ह्यातील गेवराई शहरातील एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका व्यसनी बापाने स्वतःच्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधले.
त्यानंतर तिला केळी, टरबूजच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्या. त्या मुलीच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार घडला. पीडित मुलीचा नाव रिहाना आहे. रिहानाची अवस्था पाहून हिनाला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सुटका केली. बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवर उपचार सुरु आहे.
नेमकं काय प्रकार?
ही घटना बीड जिल्ह्यातील गेवराई शहरात घडली आहे. रिहाना पाच वर्षाची आहे. आईच्या मृत्यूनंतर दहनाच्या वडिलाने तिच्यासोबत अमानुष वागणूक केली. व्यसनी बापाने जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबले होते. तिला अक्षरशः केळी, टरबूजच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणी मृत्यूच्या वेदना दिल्या. मात्र, एक महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली. हिना माहेरी गेलेली असतांना तिला सतत रडण्याचा आवाज येत होता. तिने गोठ्यात जाऊन पाहिल्यावर तिला रिहाना दिसली. रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला. हिना यांनी हज हाउसजवळील खालिद अहमद यांच्या अनाथ आश्रमात रिहानाला सोडले. खालिद यांनी तिच्यावर उपचार केले. मात्र, अनाथ आश्रमात सर्वच मुले असल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगर दामिनी पथकाची मदत घेतली. दामिनी पथकाच्या मदतीने कायदेशीर पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिहानाच्या आईचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. ती गेवराईची होती. व्यसनी वडिलांना रिहाना डोईजड झाली. रिहानाचा नैसर्गिक मृत्यू होण्याच्या उद्देशाने त्याने तिचे हालहाल केले. रिहानाला अक्षरशः जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून ठेवणे सुरू केले. सकस आहार, माणसांच्या सहवासाच्या अभावी रिहानाची बौद्धिक, शारीरिक वाढच झाली नाही. ती बोलू शकत नव्हती.