Navgan News

ताज्या बातम्या

लग्नापूर्वी बॉयफ्रेंडच्या घरी गेली तरुणी; होणाऱ्या सासऱ्याला पाहाताच हादरा …


प्रत्येकजण अशा लाइफ पार्टनरच्या शोधात असतो, जो आपल्या चांगल्या वाईट गोष्टींचा स्वीकार करून आपली साथ देईल, तो आयुष्यभर आपल्यासोबत प्रामाणिक राहील. अशा व्यक्ती शोधण्यासाठी काही जणांचं तर आख्ख आयुष्य जातं, मात्र तरी देखील आपल्या मनासारखा लाईफ पार्टनर मिळू शकत नाही.

मात्र काही जणांचं नशीब चांगलं असतं, त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार लवकर मिळतो, त्यासाठी त्यांना फार काळ वाट पाहावी लागत नाही. एका तरुणीसोबत देखील असंच घडलं आहे. या तरुणीला तिच्या मनासारखा जोडीदार मिळाला, ती त्याच्यासोबत खूप आनंदात होती. लग्न करून आपण आयुष्यभर त्याच्यासोबतच राहू असं स्वप्न ती पाहात होती. मात्र याचदरम्यान एक विचित्र घटना घडली आहे. त्यामुळे या मुलीला मोठा धक्का बसला आहे.

 

घटनेबाबत अधिक माहिती अशी की या मुलीची डेटिंग अॅपवर एका तरुणाशी ओळख झाली. आधी मैत्री झाली, त्यानंतर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर त्या दोघांनी लग्नाबाबत विचार केला. लग्नापूर्वी हा तरुण प्रेयसील आपल्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घरी घेऊन गेला. मात्र जेव्हा या तरुणीने आपल्या होणाऱ्या पतीच्या वडिलांना पाहिलं तेव्हा तिला प्रचंड धक्का बसला. काय करावं हे तिला कळेचना. लाजेनं तिची मान खाली गेली.

 

एका पॉडकास्टमध्ये तरुणीनं आपला हा अनुभव सांगितला आहे. ती म्हणाली की माझी आणि माझ्या जोडीदाराची एका डेटिंग अॅपवर ओळख झाली, ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. आम्ही दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला, त्यासाठी माझा पार्टनर मला त्याच्या आई-वडिलांना भेटण्यासाठी घेऊन गेला.

 

मात्र जेव्हा मी त्याच्या वडिलांना पाहिलं तेव्हा मला धक्काच बसला. कारण मी त्यांना एका क्रिसमस पार्टीमध्ये भेटले होते, ते माझ्यापेक्षा वयानं खूप मोठे होते, मात्र दिसायला खूप सुंदर होते, म्हणून मी त्यांना प्रपोज देखील केलं होतं, काही काळ आम्ही एकमेकांना डेट देखील करत होतो, त्यानंतर मी आता त्यांच्या मुलाच्या प्रेमात पडले आहे. त्यांची भेट होताच मला माझा भूतकाळ आठवला, असं या मुलीनं म्हटलं आहे.

 


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *