
Narendra Modi : राजकीय नेते हे देखील सेलिब्रिटी असतात, त्यामुळे त्यांच्या राहणीमानाबरोबरच त्यांच्या अन्नपानावरही मोठा खर्च होत असतो. मात्र, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे जेवणाचे खर्च तुलनेत खूपच कमी असल्याचे सांगितले जाते.
विरोधकांनी यासंदर्भात अनेकदा आरोप केले असले तरी कोणताही ठोस पुरावा सापडलेला नाही. पण पंतप्रधान मोदी आपल्या आहारासाठी किती खर्च करतात, हे जाणून घेणे रंजक ठरेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कट्टर शाकाहारी आहेत. त्यांच्या जेवणात प्रामुख्याने गायच्या तुपातून बनवलेली खिचडी, उकडलेल्या भाज्या आणि फळे यांचा समावेश असतो. ते बदामाच्या पिठापासून तयार केलेली रोटी, भेंडीची भाजी, पालक, डाळ आणि थोडासा भात खातात. त्यांचा आहार अत्यंत साधा आणि संतुलित असल्यामुळे ते चांगल्या प्रकृतीत राहतात.
त्यांच्या दुपारच्या जेवणानंतर श्रीखंड खाण्याची सवय आहे. विशेष म्हणजे ते संध्याकाळी लवकर जेवण आटोपतात. ते रोज पहाटे 4 वाजता उठून योगासने आणि व्यायाम करतात. योग हा त्यांच्या फिटनेसचा एक महत्त्वाचा भाग आहे.
पंतप्रधान मोदी हे देवी दुर्गेचे भक्त असल्यामुळे अनेकदा उपवास करतात. त्यामुळे त्यांचा आहाराचा खर्च तुलनेत कमी आहे. संसदेच्या कॅन्टीनमध्ये त्यांनी अनेकदा केवळ 50 रुपयांतच भोजन केले आहे. घरीही ते याच प्रकारचा साधा आणि पोषणमूल्ययुक्त आहार घेतात. त्यामुळे इतर नेत्यांच्या तुलनेत मोदींच्या जेवणावर होणारा खर्च फारच कमी असल्याचे स्पष्ट होते.