भाग्य आणि समृद्धी ज्या व्यक्तीच्या नशिबात असते, त्यांना काही खास संकेत मिळू लागतात. नशीब उघडण्यापूर्वी निसर्गाकडून हे संकेत मिळतात, ज्याबद्दल प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. कोणाला श्रीमंत आणि करोडपती व्हायला आवडणार नाही?
जेव्हा लक्ष्मी देवीची कृपा तुमच्यावर बरसते, तेव्हा तुम्ही रातोरात श्रीमंत होऊ शकता.
यासाठी लोक अनेक उपवास आणि पूजा करतात. ज्यामुळे प्रसन्न होऊन लक्ष्मी देवी त्यांच्यावर आपली कृपा दाखवते. जेव्हा तुमचे जीवन बदलणार असते आणि तुमच्या जीवनात खूप पैसा येणार असतो, तेव्हा तुम्हाला काही खास संकेत दिसतात. ज्यामुळे तुम्हाला कळते की, लक्ष्मी देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि ती तुमच्या घरी येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हे खास संकेत…
पैसा खाली पडणे : जर तुम्ही कोणाशीतरी व्यवहार करत असाल आणि यादरम्यान तुमच्या हातून पैसे खाली पडले, तर ते लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली सुंदर स्त्री : जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात कुठेतरी जाताना पिवळ्या रंगाचे कपडे घातलेली सुंदर स्त्री दिसली, तर ते देखील धनलाभ होण्याचे शुभ लक्षण मानले जाते. विशेषत: जर कुंभ राशीची मुलगी गुरुवारी पिवळे कपडे घातलेली दिसली, तर ते देखील धनलाभचे प्रतीक आहे.
मुंगूस आडवे जाणे : जर तुम्ही काही कामासाठी घराबाहेर जात असाल आणि मुंगूस तुमच्या मार्गात आडवे गेले, तर ते देखील धनलाभ होण्याचे शुभ लक्षण मानले जाते.
गाय दिसणे : सकाळी लवकर तुमच्या घराच्या जवळ गाय आली, विशेषत: केशरी रंगाची गाय, तर ते तुमच्या जीवनात धन येत असल्याचे लक्षण आहे.
स्वप्नात शुभ संकेत दिसणे : जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पोवळे, मोती, हिरा किंवा मुकुट दिसला तर याचा अर्थ असा आहे की लक्ष्मी देवी त्याच्या घरात कायमस्वरूपी वास करेल.
साप चावताना दिसणे : जर एखाद्याला स्वप्नात पांढरा साप उजव्या हाताला चावताना दिसला, तर ते देखील धनलाभ होण्याचे शुभ लक्षण आहे.