महाराष्ट्रराजकीय

pankaja Munde : पंकजा मुडेंच्या पराभवाचं कारण आलं समोर ? व्हायरल ऑडीओ क्लिपवर शिंदे गटाची प्रतिक्रिया


pankaja Munde : बीड यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बीडमध्ये पंकजा मुंडेंचा (Pankaja Munde) 6 हजार मतांनी पराभव झाला. हा पराभव महायुतीतील घटक पक्षांनी पंकजा मुंडेंविरुद्ध काम केल्यामुळे झाल्याचा आरोप करण्यात आला होता.

याशिवाय मराठा आणि वंजारी अशा जातीय संघर्षामुळे पंकजा मुंडे यांना कमी मत मिळाली, अशीची चर्चा रंगली आहे. अशातच आता बीड जिल्ह्यातून शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांची ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यात पंकजा मुंडेंविरुद्ध बीड लोकसभा मतदारसंघातील सगळ्या बुथवर कशाप्रकारे बजरंग सोनावणे यांच्यासाठी फिल्डिंग लावली हे सांगताना ते दिसत आहे. मात्र कुंडलिक खांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. (Beed Politics The reason for Pankaja Mude defeat has come to light The Shinde group reacts to the viral audio clip)

शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शिवराज बांगर यांच्याशी बोलताना ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. कुंडलिक म्हणत आहेत की, मी बजरंग सोनावणे यांचं काम केलं आहे. त्यांनी आता आपला दिलेला शब्द पाळावा. फक्त माझ्या गावातील 100-200 मतं पंकजा मुंडे यांना जास्त गेली आहेत. कारण ते करणं मला गरजेचं होतं. मला जातीवादी शिक्का नको आहे. ओबीसी मतांचा आपल्याला विधानसभेला फायदाच आहे. बाकी 376 बुथवरची यंत्रणा मी बजरंग सोनावणे यांना देऊन टाकली हेही तितकंच खरं आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा पंकजा मुंडेंना धोका दिला आहे. यावर शिवराज बांगर म्हणतात की, नुसती यंत्रणा नाही, तर बजरंग सोनावणे यांच्यासाठी पैसेही दिले का? यावर कुंडलिक खांडे म्हणतात की, नुसती यंत्रणा नाही तर मी लोकांना पैसे देखील दिले आहेत.

दरम्यान, कुंडलिक खांडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्याची ऑडीओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे समर्थकाकडून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कुंडलिक खांडे यांच्यावर टीका होताना यला मिळत आहे. पंकजा मुंडे समर्थकांनी कुंडलिक खांडेंचे ऑफीसही फोडलं आहे. या प्रकरणानंतर कुंडलिक खाडेंचा फोन बंद आहे, पण ऑडिओ क्लिपमधून व्हायरल होणारा आवाज त्यांचा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंडेंच्या पराभवानंतर कार्यकर्त्यांच्या आत्महत्या

दरम्यान, पंकजा मुंडेंचा फक्त 6 हजार मतांनी पराभव झालेला त्यांच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे. पंकजा मुंडेंच्या पराभवानंतर बीज जिल्ह्यात तीन कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. याशिवाय पंकजा मुंडेंसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे बीड जिल्ह्यातील पाथर्डी, शिरुर, परळीसह विविध ठिकाणी बंद पुकारत पंकजा मुंडेंच्या समर्थकांकडून निषेध व्यक्त करण्यात आला होता.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *