Earth : लाखो-करोडो वर्षांपासून पृथ्वी अस्तित्वात आहे. मात्र अनेकवेळा पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आहे अशी माहिती समोर येत असते. काहीजण म्हणतात की एखाद्या जीवघेण्या महामारीमुळे मानवजात नष्ट होणार आहे, तर काहीजण म्हणतात की एलिअन्सच्या हल्ल्यामुळे पृथ्वीचा विनाश होणार आहे.
अशातच आता अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक अहवाल सादर केला आहे. या पृथ्वी येत्या 14 वर्षांत नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा अहवाल काय आहे याबाबत माहिती जाणून घेऊयात.
नासाच्या अहवालातून महत्वाची माहिती
अमेरिकन अंतराळ संस्था नासाने अलिकडेच एक अहवाल सादर केला आहे. त्यात येत्या 14 वर्षांत एक धोकादायक लघुग्रह पृथ्वीवर आदळू शकतो अशी माहिती देण्यात आली आहे. या महाकाय लघुग्रहाची टक्कर होण्याची शक्यता 72 टक्के आहे असंही नासाने आपल्या अहवातात म्हटले आहे. नासाने या लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची तारीखही सांगितली आहे. 12 जुलै 2038 रोजी ही टक्कर होईल असंही नासाने म्हटलं आहे.
नासाने जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीत 20 जून रोजी याबाबत माहिती दिली होती. टेबलटॉप प्रॅक्टिसमधून ही माहिती समोर आली आहे. या प्रॅक्टिसमध्ये नासा व्यतिरिक्त अमेरिकन सरकार आणि इतर देशांच्या 100 हून अधिक विविध एजन्सींनीही सहभाग घेतला होता.
लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची 72 टक्के शक्यता
या धोक्याचा सामना करण्यासाठी पृथ्वीच्या क्षमतेचे मूल्यांकन करता यावे यासाठी ही टेबलटॉप प्रॅक्टिस आयोजित करण्यात आली होती. यावेळी एक विशेष प्रकारचे वातावरण तयार केले गेले होते. यानंतर हा लघुग्रह पृथ्वीवर आदळण्याची 72 टक्के शक्यता आहे आणि यासाठी सुमारे 14 वर्षे लागतील असा निष्कर्ष समोर आला आहे. मात्र या लघुग्रहाचा आकार रचना आणि मार्गाबाबत कोणतीही माहिती अद्याप समोल आलेली नाही. त्यामुळे यावर अजून संशोधन सुरु आहे.
नासाचे अधिकारी लिंडली जॉन्सन याबाबत म्हणाले की, एक मोठा लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने येणे ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. ही आपत्ती टाळण्याचा मार्ग शोधण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या प्रयत्न देखील केले जाऊ शकतात. यावर आम्ही काम करत आहोत.
लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास काय होईल?
एखादा लघुग्रह पृथ्वीवर आदळल्यास जीवसृष्टीला धोका निर्माण होऊ शकतो. या घटनेमुळे अनेक सजीवांचा मृत्यू होऊ शकतो. पृथ्वीवर आदळणारा लघुग्रह किती मोठा आहे त्यावरुन विनाशाची तीव्रता ठरेल. लघुग्रह छोटा असेल तर एखादे शहराचा नाश होऊ शकतो, आणि हा लघुग्र मोठा असेल तर संपूर्ण पृथ्वीचा विनाश होऊ शकतो.