संपादकीय

आयुष्मान कार्डवर हॉस्पिटलने मोफत उपचार करण्यास दिला नकार, तर फिरवा ‘हा’ नंबर, समस्या ताबडतोब लागेल मार्गी


 

आयुष्मान कार्डवर हॉस्पिटलने मोफत उपचार करण्यास दिला नकार, तर फिरवा ‘हा’ नंबर, समस्‍या ताबडतोब लागेल मार्गी

 

Ayushman Bharat Yojana | आयुष्‍मान योजनेत देशभरातील हॉस्पिटल मोठ्या संख्येने रजिस्टर्ड आहेत. या योजनेच्या पॅनेलमध्ये सहभागी कोणत्याही हॉस्पिटलमध्ये आयुष्‍मान कार्डधारक उपचार करू शकतात. मात्र, अनेकदा ही हॉस्पिटल कार्डधारकाला उपचार करण्यास नकार देतात. हॉस्पिटल अशा प्रकारे नकार देऊ शकत नाही. अशावेळी कार्डधारकाने कुठे तक्रार करावी ते जाणून घेऊया…

येथे करा तक्रार

आयुष्‍मान योजनेच्या पॅनलमध्ये सहभागी हॉस्पिटलमध्ये ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करता येतो. हॉस्पिटलने उपचार करण्यास नकार दिल्यास गप्प बसू नका. तुम्ही टोल फ्री नंबर आणि पोर्टलच्या माध्यमातून तक्रार नोंदवा.

१४५५५ हा आयुष्‍मान भारत योजनेचा राष्‍टड्ढीय स्‍तरावरील एक टोल फ्री नंबर आहे. यावर देशातील कोणत्याही राज्यात राहणारा नागरिक तक्रार करू शकतो. हिंदी आणि इंग्रजीशिवाय इतर भाषांमध्ये सुद्धा तक्रार नोंदवता येते. (Ayushman Bharat Yojana)

राज्‍यांचे सुद्धा टोल फ्री नंबर

वेगवेगळ्या राज्यांसाठी सुद्धा टोल फ्री नंबर जारी करण्यात आले आहेत.
उत्‍तर प्रदेशमध्ये राहणारे लोक १८००१८००४४४४ नंबरवर तक्रार नोंदवू शकतात.
मध्‍य प्रदेशच्या नागरिकांसाठी टोल फ्री नंबर १८००२३३२०८५ आहे.

अशाप्रकारे बिहारमध्ये राहणारे आयुष्‍मान योजनेसंबंधी तक्रार १०४ वर आणि उत्‍तराखंडचे नागरिक १५५३६८ आणि १८००१८०५३६८ वर आपली तक्रार नोंदवू शकतात.

Portal वर सुद्धा करू शकता तक्रार

जर टोल फ्री नंबरवर तक्रार करून सुद्धा तुमची सुनावणी होत नसेल तर https://cgrms.pmjay.gov.in/GRMS/loginnew.htm लिंक वर क्लिक करून तुमची तक्रार नोंदवा.
या पोर्टलवर REGISTER YOUR GRIEVANCE च्या ऑपशनवर क्लिक करून तक्रार नोंदवली जाते.

Pune Police Inspector Transfer | औंध: दरोड्याच्या उद्देशाने केलेल्या हल्ल्यात जेष्ठ नागरिकाचा मृत्यू, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नियंत्रण कक्षात बदली

Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी : पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले, येऊन पाहतात तर घर भुईसपाट; 5 जणांवर FIR

Ayushman Bharat YojanaREGISTER YOUR GRIEVANCEआयुष्मान कार्डआयुष्‍मान भारत योजनाहॉस्पिटल मोफत उपचार


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *